पुणे

कोथरूडमध्ये इमारतीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू

CD

पुणे, ता. १२ : गृहप्रकल्पाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना चौथ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना कोथरूड परिसरातील शांतिबन चौकातील एका इमारतीमध्ये घडली.
संजय हरिभाऊ वाळंज (वय ४८, रा. किष्किंधानगर, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी वाळंज यांची पत्नी सारिका (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून कोथरूड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १० मार्च रोजी दुपारी घडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुगणेशनगर परिसरात नियोजित आर. के. प्राइड या गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर वाळंज काम करीत होते. त्यावेळी त्यांचा तोल गेल्यामुळे चौथ्या मजल्यावरून पडून वाळंज गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, जाळी, सेफ्टी बेल्ट अशी साधने पुरवली नाहीत. त्यात हलगर्जीपणा केल्यामुळे ही दुर्घटना घडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT