पुणे

सामाजिक समरसता मंचाने जोडले समाजमन : इदाते

CD

पुणे, ता.१३ : सामाजिक समरसता मंचाने चार दशकात बलुतेदार, अठरापगड संस्था व भटके विमुक्त यांना एकत्र आणून समाजमन जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केल्याचे पद्मश्री भिकुजी यांनी सांगितले.
क्षत्रिय मराठा परीट तरुण मंडळाच्यावतीने पाच दशके समाजसेवापूर्ती व जनसेवा बँकेच्या संचालकपदी समरसता मंचाचे पुणे शहर माजी अध्यक्ष नंदकुमार राऊत यांची नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी इदाते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर सुरेश नाशिककर उपस्थित होते. तर व्यासपीठावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन प्रमुख सुनील भंडगे, बाबासाहेब जाधव, बारा बलुतेदार समाज विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष रामदास सूर्यवंशी, माजी नगरसेवक नीलेश निकम, माजी नगरसेविका स्वाती लोखंडे, अभिनेता निखिल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
इदाते म्हणाले, ‘‘सामाजिक समरसतेची धुरा ज्यांनी खांद्यावर घेत कार्य केले, त्या प्रत्येकाचे योगदान मोठे आहे. त्यापैकी नंदकुमार राऊत यांचे कार्य कौतुकास्पद आहे. परीट सेवा मंडळाचे अध्यक्ष अनुप राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.नीलेश राऊत सूत्रसंचालन केले, तर संतोषी पारडे यांनी आभार मानले. सुरेश नाशिककर, दत्ता फंड, प्रकाश अभ्यंकर, पुष्पा भोसले, सुनील शिंदे आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT