पुणे

चाकणमधील औद्योगिक वीजपुरवठा खंडित

CD

पुणे, ता. १९ : आंबेठाण येथील ३३ केव्ही डबलसर्किट वीजवाहिन्यांच्या खांबाला एका वाहनाने रविवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास धडक दिली. त्यामुळे वीजखांबासह वाहिन्या जमीनदोस्त झाल्या. परिणामी चाकणमधील ३० औद्योगिक (कंपन्या) ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, महावितरणने तातडीने पर्यायी तांत्रिक उपाययोजना करत आज दुपारी १२.४१ वाजता सर्वच कंपन्यांचा वीजपुरवठा सुरू करून दिला. महापारेषणच्या चाकण १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून ह्युंदाई-कॉर्निंग ३३ केव्ही डबलसर्किट वीजवाहिनीद्वारे चाकण एमआयडीसी फेज दोनमधील उद्योगांना वीजपुरवठा केला जातो. मात्र या वीजवाहिनीच्या खांबाला आंबेठाण रस्त्यावर अज्ञात वाहनाने आज पहाटे एकच्या सुमारास धडक दिली. नंतर चालक वाहनासह पळून गेला. मात्र या धडकेत वीजखांब व डबल सर्कीटच्या वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्याने चाकणमधील ३० उद्योगांचा वीजपुरवठा खंडित झाला.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे, शाखा अभियंता रामप्रसाद नरवडे, जनमित्र योगेश जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन इतर वीजवाहिन्यांद्वारे पर्यायी वीजपुरवठ्याची तयारी सुरू केली. तांत्रिक उपाययोजना झाल्यानंतर सर्वच ३० उद्योगांचा वीजपुरवठा दुपारी १२.४१ वाजता पर्यायी व्यवस्थेतून सुरू करण्यात आला. तसेच जमीनदोस्त झालेल्या वीजखांबाची उभारणी, वीजवाहिन्यांची जोडणी तसेच डिस्क इन्सुलेटर बदलण्यासह इतर कामे सुरू करण्यात आले असून, सायंकाळपर्यंत सर्व कामे पूर्ण होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT