पुणे

‘गंधर्वसख्यम्’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन

CD

पुणे, ता. २० ः ‘संस्कृतश्री’ संस्थेतर्फे ‘गंधर्वसख्यम्’ या संस्मरा अर्थात संस्कृत आणि मराठी भाषेतील एका अनोख्या सादरीकरणाचे आयोजन केले आहे. मराठी व संस्कृत गीते, अभिनय, अभिवचन आणि नृत्य यांचा मिलाफ असणारे हे सादरीकरण शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी ७ वाजता कोथरूड येथील ‘द बॉक्स’ येथे होणार आहे.
या सादरीकरणाची संहिता डॉ. श्रीहरी गोकर्णकर यांची व संगीत प्रांजल अक्कलकोटकर यांचे आहे. तर या दोघांनीच याचे दिग्दर्शन केले आहे. तंत्रज्ञानाच्या जमान्यात पृथ्वीवर अवतरलेल्या एका गंधर्वांची आणि त्याच्या कांतेची कथा या सादरीकरणाद्वारे मांडण्यात आली आहे. या गंधर्वाला फक्त संस्कृत भाषा येत असते. अशा परिस्थितीत तो सखीला पूर्व स्मृतींची जाणीव करून देऊ शकेल का, त्याला गंधर्व लोकांचे नियम तोडल्यामुळे काय परिणाम भोगावे लागतात, आदी प्रश्नांचा उलगडा यातून होतो. या सादरीकरणाची मुख्य भाषा मराठी असली, तरी यात संस्कृत संवाद तसेच सुभाषिते याची गुंफण आहे. या प्रयोगाला विनामूल्य प्रवेश असून अधिकाधिक लोकांनी सादरीकरणाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT