पुणे

ससून रुग्णालयातील सेवा सुरळीत

CD

पुणे, ता. २० ः ससून रुग्णालयातील रुग्णसेवा सोमवारी रात्रीपासून पूर्ववत सुरू झाली. मात्र दिवसभर रुग्णांची गैरसोय झाली. गेल्या सात दिवसांपासून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपाचा परिणाम ससूनमधील रुग्णसेवेवर झाला होता. दरम्यान, संपावर गेलेले वर्ग ३ व ४चे कर्मचारी मंगळवारपासून कामावर हजर हाेणार आहेत.
या संपात शंभर टक्के परिचारिका सहभागी झाल्या हाेत्या. त्यामुळे सर्व सेवा प्रशिक्षणार्थी १५० परिचारिकांवर होती, तर तत्पुरत्या भरती केलेल्या १२० परिचारिकांची मदत घेण्यात आली होती. परंतु दरराेजची रुग्णसंख्या आणि परिचारिकांचे प्रमाण व्यस्त होते. त्यामुळे रुग्णांना वेळेला उपचार मिळण्यास अडचणी येत होत्या. दरम्यान, याबाबत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर म्हणाले, ‘‘करार तत्त्वावरील परिचारिकांना २९ दिवस कामावर ठेवणार असून, त्यांना २९ दिवसांचे वेतन देणार आहोत. संपादरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवली, तसेच अत्यावश्‍यक शस्त्रक्रिया करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे रुग्णसेवेवर संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही.’’

साेमवारी झालेली रुग्णसेवा
नवीन ॲडमिशन ः १०९
ओपीडी ः १४८०
आंतरविभागात दाखल रुग्ण ः ८०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT