पुणे

गुन्हे वृत्त

CD

‘पीएमपी’ बसचालकाला मारहाण
पुणे, ता. २१ : ‘बस नीट चालविता येत नाही का’, असे म्हणत एका कारचालकाने पीएमपी बसचालकास शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना मुंढवा चौकाजवळ एका कार सर्व्हिस सेंटरसमोर सोमवारी घडली. याप्रकरणी पीएमपी बसचालक इरबा मारुती इबितदार (वय ३०, रा. केसनंद रस्ता, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी बसचालक इबितदार हे मगरपट्टा-मुंढवा रस्त्याने सकाळी दहाच्या सुमारास वाघोलीच्या दिशेने निघाले होते. मुंढवा चौकात एका कारचालकाने बसला पाठीमागून धडक दिली. त्यावेळी कारचालकाने बसचालकाला शिवीगाळ करून खाली ओढून मारहाण केली. या घटनेनंतर कारचालक पसार झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर करत आहेत.

टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे, ता. २१ : भरधाव टेम्पोच्या धडकेने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज परिसरातील जैन मंदिराजवळ घडली. हा अपघात सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला. कैलास दत्तू मळेकर (वय ४०, रा. नेताजीनगर, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी मळेकर यांची पत्नी संगीता यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून टेम्पोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार कैलास मळेकर हे कात्रज परिसरातून जात होते. त्यावेळी भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिल्यामुळे मळेकर यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन देशमुख करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT