पुणे

चित्ररथाद्वारे सरकारी योजनांबाबत जनजागृती

CD

पुणे, ता. २३ ः पुणे शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चित्ररथाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी दोन चित्ररथ (एलईडी डिस्प्ले व्हॅन) तयार करण्यात आले आहेत. या चित्ररथांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुमारे दीडशे गावांमध्ये सरकारी योजनांबाबत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ही जागृती करण्यात येत आहे.

अनुसूचित जाती व जमातीच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांवर आधारित विविध विषयांवरील लघुचित्रफिती तयार करण्यात आल्या आहेत. या चित्ररथाच्या माध्यमातून आतापर्यंत पुणे शहरातील कोंढवे धावडे, किरकटवाडी, बिबवेवाडी, शंकर महाराज वसाहत, तळजाई वसाहत, सिद्धार्थ वसाहत, अंबिल ओढा, कासेवाडी, रामटेकडी, पर्वती दर्शन, पर्वती पायथा, दत्तवाडी, दांडेकर पूल, शिवदर्शन वसाहत भागात जनजागृती करण्यात आली आहे. यशिवाय हवेली तालुक्यातील खडकवासला, खेड शिवापूर, वडकी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, मांजरी खुर्द, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, हिंगणगाव, सासवड, जेजुरी येथेही जागृती करण्यात आली. तसेच बारामती तालुक्यातील निंबूत, वाघळवाडी, वाणेवाडी, करंजे, मुरूम, होळ, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे खुर्द, कोऱ्हाळे बुद्रूक, थोपटेवाडी, लाटे माळवाडी, कांबळेश्वर, सांगवी, पवईमाळ, पणदरे, माळेगाव बुद्रूक, खांडज, नीरा वागज, मेखळी आणि सोनगाव या गावांमध्येही योजनांबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT