पुणे

पायाभूत सुविधांना बूस्टर देण्याचा ‘संकल्प’

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २४ : शहरातील पायाभूत सुविधांना बूस्टर देणारा नऊ हजार ५१५ कोटी रुपयांचा पुढील आर्थिक वर्षाचा (२०२३-२४) अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी शुक्रवारी सादर केला. या निमित्ताने महापालिकेच्या उत्पन्नाने कागदोपत्री का होईना साडेनऊ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. कोणतीही कर वाढ न करता आणि ठोस उपाययोजना न सुचवता चालू वर्षीपेक्षा पुढील वर्षात सुमारे एक हजार कोटी रुपयांनी उत्पन्नात वाढ होईल, असा दावा प्रशासकांनी केला आहे.

समान पाणीपुरवठा, वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रस्त्यांचे जाळे, नदी सुधार योजना, जायका यांसारख्या शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करतानाच सर्वसामान्य पुणेकरांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. प्रशासक या नात्याने स्थायी समिती आणि सर्वसाधारण अधिकार असलेल्या आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करून त्यास आज मान्यता दिल्याने एक एप्रिलपासून त्यांची अंमलबजावणी होणार आहे. प्रशासकांच्या काळातील हा दुसरा अर्थसंकल्प ठरला आहे.
चालू आर्थिक वर्षात महापालिकेला आठ हजार ५९२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे प्रशासनाने अपेक्षित धरले होते. परंतु, ३१ मार्च अखेरपर्यंत जेमतेम सात हजार १०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे. असे असताना पुढील आर्थिक वर्षात चालू आर्थिक वर्षी अपेक्षित धरलेल्या उत्पन्नापेक्षा ९२३ कोटी रुपयांनी अधिक महसूल जमा होईल, असे अपेक्षित धरून नऊ हजार ५१५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. प्रशासनाकडून वास्तवादी अर्थसंकल्प मांडण्याची अपेक्षा होती. परंतु कोणतीही ठोस उपाययोजना अथवा नवीन स्त्रेात न सुचवता प्रशासकांकडून वाढीव रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यामुळे यंदा महापालिकेने कागदोपत्री का होईना साडेनऊ हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला. त्यामुळे अनेक अर्थाने हा अर्थसंकल्प वैशिष्टपूर्ण ठरला आहे.

काय आहे गणित?
वस्तू व सेवा कर (२९ टक्के) आणि मिळकत कर (२४ टक्के) हे दोन उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. हे दोन्ही मिळून महापालिकेच्या तिजोरीत ५३ टक्के उत्पन्न जमा होईल, या भरवशावर हा अर्थसंकल्प मांडला आहे. शहर विकास शुल्क (१९ टक्के) आणि इतर जमा (१० टक्के) हे त्या खालोखाल उत्पन्नाचे मार्ग आहेत. तर जमा होणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी ३३ टक्के खर्च सेवक वर्गाचे वेतन आणि निवृत्तिवेतन दर्शविला आहे. एकूण उत्पन्नाच्या ३९ टक्के रक्कम ही भांडवली विकास कामांसाठी करण्यात आली आहे.


- भांडवली विकास कामांसाठी ३७५५ कोटी रुपयांची तरतूद
- वेतन आणि निवृत्तीवेतनावरील अपेक्षित खर्च तीन हजार कोटी रुपये
- प्रधानमंत्री आवास योजना आणि समान पाणी पुरवठा योजना यंदा पूर्ण करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Ferritin Test: ‘नॉर्मल’ हिमोग्लोबिनमुळे गाफील राहू नका! ‘फेरिटिन’ टेस्टही आहे तितकीच महत्त्वाची

Latest Marathi News Live Update: सोलापूर शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारिणी जाहीर

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

SCROLL FOR NEXT