पुणे

सिंहगडावर उद्या पालखी सोहळा

CD

पुणे, ता. २ : विश्व हिंदू परिषद आणि श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती, किल्ले सिंहगड यांच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खास पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रविवारी (ता. ४ जून) सकाळी १० वाजता सिंहगडावर आयोजित करण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र मंत्री संजय मुरदाळे यांनी या विषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष शरद पवार, श्रीकांत चिल्लाळ, श्रीपाद रामदासी उपस्थित होते. श्री शिवराज्याभिषेक दिन व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सरनोबत सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज आकाश कंक उपस्थित राहणार आहेत. रविवारी सकाळी ८ वाजता छत्रपती राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकापासून दुचाकी रॅलीद्वारे कार्यक्रमास सुरुवात होईल.

दरम्यान, छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करावी, तसेच सिंहगड येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्यात यावेत, अशी मागणी पालकमंत्री पाटील यांच्याकडे करण्यात येणार असल्याचेही मुरदाळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; जयराम रमेश यांनी दिली माहिती

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT