पुणे

बालगंधर्व समस्या अखेर बालगंधर्व रंगमंदीरातील पाणी समस्येचा "पडदा'' उघडला !

CD

बालगंधर्वसाठी स्वतंत्र जलवाहिनी
प्रशासनाकडून अखेर तीन वर्षांनी उपाय
पुणे, ता. ६ ः बालगंधर्व रंगमंदीराची किमान एक तरी समस्या सोडविण्याचा उपाय महापालिका प्रशासनाला अखेर अडीच ते तीन वर्षांनी सुचला. प्रेक्षक, कलाकारांच्या टिकेनंतर पुरेसे पाणी पुरविण्याचे प्रशासनाने मनावर घेत स्वतंत्र जलवाहिनी टाकली.
कमालीची अस्वच्छता, डासांचा प्रादूर्भाव, अपुरा पाणी पुरवठा, बंद पडलेली वातानुकूलन यंत्रणा, सतत बिघाड होत असलेली प्रकाश व ध्वनी यंत्रणा, वाहनतळ अशा असंख्य अडचणींचा सामना प्रेक्षक, कलाकारांना करावा लागत होता. मागील चार ते पाच महिन्यांपासून नाट्य व्यवस्थापक, कलाकार व प्रेक्षक यांच्याकडून पालिका अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला जात होता. मात्र त्यांना प्रतिसाद दिला जात नव्हता. काही नामवंत कलाकारांनी संतप्त होऊन तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही.
या प्रश्‍नावर प्रसार माध्यमांनी सडकून टीका केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली. त्यानंतर त्यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमवेत बैठक घेऊन ऑगस्ट अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरवात केली. दोन दिवसांपूर्वी प्रकाश-ध्वनी यंत्रणा, वातानुकूलन यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीची निविदा काढण्यात आली. आत्तापर्यंत नाट्यगृहाला पाणी पुरवठा कमी दाबाने सुरु होता. त्यातच मेट्रोच्या कामामध्ये बालगंधर्व रंगमंदीराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाणी आणखी कमी दाबाने येऊन अडचणींत भर पडली होती. अखेर हा प्रश्न सोडविताना गंधर्व हॉटेलकडून दीड इंच व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी घेण्यात आली. गेले तीन दिवस हे काम सुरु होते. ते पूर्ण झाले असून पाणीपुरवठाही सुरळीत होऊ लागला आहे.
---
प्रेक्षक, कलाकारांची तक्रार कायम
बालगंधर्व पाडून अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त नाट्यगृह बांधण्याचा निर्णय महापालिकेने तीन वर्षांपूर्वी घेतला. तेव्हापासून तेथे सुविधा पुरविण्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत होते. यामुळे प्रेक्षक, कलाकार, तंत्रज्ञ यांना सतत गैरसोयींचा सामना करावा लागत होता. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याची तक्रार प्रेक्षक, कलाकारांनी केली.
---
मेट्रोच्या कामामुळे बालगंधर्व रंगमंदीराला होणारा पाणीपुरवठा कमी झाला होता. त्यामुळे दीड इंच व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर तेथील समस्या सुटण्यास मदत होईल.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

SCROLL FOR NEXT