पुणे

‘एव्हिएशन गॅलरी’ सुरू करण्यासाठी प्रयत्न महापालिका ः पुन्हा एकदा राबवावी लागणार निविदा प्रक्रिया

CD

पुणे, ता. २८ ः महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने मागील दीड वर्षापासून बंद पडलेली ‘एव्हिएशन गॅलरी’ सुरू करण्यासाठी महापालिकेला पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. यापूर्वीच्या निविदा प्रक्रियेसाठी केवळ एक निविदा दाखल झाल्यामुळे महापालिकेकडून ही प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येत आहे.
महापालिकेने शिवाजीनगर गावठाण परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून ‘सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी’ उभारली होती. मार्च २०२० मध्ये एव्हिएशन गॅलरीचे उद्‌घाटन झाले. प्रारंभी कोरोनामुळे, तर नंतर महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एव्हिएशन गॅलरी मागील दीड वर्षांपासून धुळखात पडून होती. त्याबाबत ‘सकाळ’ने १० ऑगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेत एव्हिएशन गॅलरी पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, एव्हिएशन गॅलरी चालविणे व त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने ६ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवून निविदा मागविल्या होत्या. मात्र, महापालिकेने दिलेल्या मुदतीत केवळ एका संस्थेनेच निविदा सादर केली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबविण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार आता ५ डिसेंबरपर्यंत निविदा सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार माहिती
एव्हिएशन गॅलरीमध्ये प्रदर्शन, विमान, हेलिकॉप्टरचे मॉडेल, ड्रोन, एरोमॉडलिंग, पॅरामोटरिंग, दृकश्राव्य सादरीकरण यांचा समावेश आहे. लहान मुलांमध्ये विमान, अंतराळ विज्ञान क्षेत्रासंबंधी उत्सुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने त्याची रचना केली आहे. याचा उपयोग शहरातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना विमानांबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती मिळण्यासाठी होणार आहे.

एव्हिएशन गॅलरी चालविणे व देखभाल दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, एकच निविदा दाखल झाल्याने ही प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येणार आहे. ५ डिसेंबरला निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.
- डॉ. चेतना केरूरे, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT