पुणे

ज्येष्ठ संकटात असल्याची कुटुंबीयांना माहिती मिळणार

CD

सनील गाडेकर : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २७ : घरातील ज्येष्ठ व्यक्ती दैनंदिन काम करताना पडली. घराबाहेर गेल्यानंतर त्यांचा काही अपघात झाला. आजारपणामुळे रस्ता विसरले किंवा अनपेक्षित घटना घडल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींना त्वरित त्याची माहिती मिळतेच असे नाही. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला काठीचा आधार देखील निराधार होतो. वेळेत मदत न मिळाल्याने किंवा ज्येष्ठ व्यक्ती कुठे आहे, हे न समजल्याने त्यांच्यावर आलेले संकट आणखी बळावू शकते. पण, आता ‘स्मार्ट काठी’मुळे ही चिंता मिटली आहे.

अपघातावेळी ज्येष्ठांच्या सोबत असलेली काठी खऱ्याअर्थाने त्यांची सोबती व्हावी म्हणून पुण्यातील चार मित्रांनी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत काही अघटित झाले आहे का?, ते सुस्थितीत आहेत का? ते कुठे रस्ता तर चुकले नाहीत नाही ना? अशा सर्व काळजी मिटविण्यासाठी या चौघांनी स्मार्ट काठी तयार केली आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा आधार असलेली काठी देखील स्मार्ट झाली असून त्यामुळे कुटुंबीयांची चिंता कमी होणार आहे. ‘एमी केन’ असे या काठीचे नाव आहे. डॉ. प्रसाद होनप, नितीन कुलकर्णी, राजेंद्र सप्रे आणि मनोज कचरे यांनी या स्टार्टअपची स्थापना केली आहे. ‘एमएनपीआर हेल्थ गॅझेट एलएलपी’ ( MNPR Health Gadgets LLP) असे त्यांच्या स्टार्टअपचे नाव.

अपघातानंतर सुचली कल्पना
डॉ. होनप यांची नातेवार्इक महिला ९७ वर्षांची असताना त्या घरात पडल्या होत्या. दुखापत झाल्यानंतर त्यांना उठताच येत नाहीये. त्या पडल्या तेव्हा त्यांना लगेच मदत मिळाली नाही. कारण त्यावेळी घरात कोणी नव्हते. असा प्रसंग इतर कोणाच्या बाबतीत होवू नये, या विचारात असताना डॉ. होनप यांनी त्यांच्या मित्रांशी चर्चा केली. तेव्हा सुचलेल्या कल्पनेतून या स्टार्टअपची सुरुवात झाली.

एकट्या पालकांचे अपडेट मिळणार
मुलीचे लग्न झाले आहे, मुलगा परदेशात किंवा दुसऱ्या राज्यात नोकरीला आहे. त्यामुळे घरात केवळ ज्येष्ठ आर्इ-वडीलच राहात असलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. ते व्यवस्थित आहेत की नाही. तसेच ते कुठे बाहेर आहेत का? याची चिंता मुलांना असते. मुलांची ही चिंता दूर करण्यासाठी ‘ॲमी केन’मध्ये जीपीएस देखील बसविले आहे. त्यामुळे आपले पालक कुठे आहेत, ते रस्ता तर चुकले नाहीत ना?, याची माहिती मुलांना किंवा कुटुंबीयांना त्यांच्या मोबार्इलमध्ये मिळते.

ॲमी केनची वैशिष्ट्ये...
- काठी घेऊन पडल्यास कुटुंबीयांना अलर्ट मिळतो
- मदत हवी असल्याचा फोन व मेसेज पाठवता येतो
- चुकून काठी पडल्यास ‘ऑल इज वेल’चा अलर्ट
- नेहमीचा मार्ग सोडून इतरत्र गेल्यास नोटिफिकेशन येते
- एलर्इटी बॅटरी

वय वाढत जाते, तसे विविध कारणांमुळे नागरिकांचे पडण्याचे प्रमाण वाढत असते. आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या बाबतीत काही गैरप्रकार झाला तर तो इतर सदस्यांना त्वरित समजावा म्हणून आम्ही ही स्मार्ट काठी तयार केली आहे. काठीचा वापरकर्ता व्यवस्थित असताना काही चुकीचे नोटिफिकेशन जाणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे. तसेच एकावेळी तिघांचे नंबर यात सेव्ह करता येतात. त्यामुळे एकाशी संपर्क झाला नाही तर दुसऱ्या सदस्याकडून मदत मिळू शकते.
- डॉ. प्रसाद होनप,
सहसंस्थापक, एमएनपीआर हेल्थ गॅझेट एलएलपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT