पुणे, ता. २८ : महाराष्ट्रातील मंदिरांचे जतन व संवर्धन करावे, मंदिरांचे सरकारीकरण थांबविणे, विविध प्रश्नांचे निराकरण, मंदिरात प्रवेश करताना वस्त्रसंहिता (ड्रेसकोड), भाविकांसाठी सोयीसुविधा, दर्शनरांगा, देवस्थानांमधील अंतर्गत वाद अशा विविध प्रश्नांवर ऊहापोह करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे २ आणि ३ डिसेंबरला ओझर येथे दुसरी महाराष्ट्र मंदिर परिषद होणार आहे. परिषदेत महाराष्ट्रातील साडेपाचशेहून अधिक मंदिरांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी कसबा गणपती ट्रस्टच्या विश्वस्त संगीता ठकार, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री विद्याधर नालगोलकर, पुणे जिल्हा जैन महासंघाचे सचिव रमेश ओसवाल, भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे, करमाळा येथील श्री दत्त मंदिराचे विश्वस्त दत्तात्रय देवळे उपस्थित होते. ही परिषद ओझर येथील विघ्नहर सभागृहात होणार आहे. परिषदेसाठी ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते विष्णूशंकर जैन यांच्यासह विविध मंदिरे, देवस्थानांचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. परिषदेत मंदिरात प्रवेश करताना वस्त्रसंहितेचे पालन करणे, मंदिरातील पावित्र्याचे रक्षण, प्राचीन मंदिर संवर्धन, मंदिरांचे सरकारीकरण थांबविणे अशा विविध विषयांवर चर्चा केली जाणार असल्याचे घनवट यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.