पुणे

दिवाळी अंक स्वागत

CD

शुभम
------------
लेख, कथा, विनोदी कथा, विज्ञान कथा, पुस्तक परिचय, लघुकादंबरी, बालसाहित्य, व्यंगचित्रे आदी भरगच्च साहित्य फराळ ‘शुभम’च्या दिवाळी अंकात आहे. पी. एम. मनोहर, श्रीनिवास वारुंजीकर, श्रीपाद ब्रह्मे, उद्धव कानडे, भूषण तांबे, डॉ. प्रकाश जाधव आदींचे विविध विषयांवर लेख आहेत. सु. ल. खुटवड, सचिन बेंडभर आदींच्या विनोदी कथा तर महेंद्र फाटे, देवबा पाटील, उद्धव भयवाळ, विजय महादर आदींच्या विविध विषयांवरील कथा अंकात आहेत. शिवाजी देशमुख यांची विज्ञानकथा आहे. विनोद रोडगे यांची मालू ही लघुकादंबरी अंकात आहे. संध्या राजन, भारती सावंत, नीलिमा नातू, प्रा. दीपक कांबळे, लीना पांडे आदींचे बालसाहित्य आहे. प्रशांत आष्टीकर यांच्या व्ंयगचित्रांनी अंकाची उंची वाढली आहे.
संपादक ः मनीषा फाटे, पाने ः २१६, किंमत ः ३५० रुपये
----------------------------------
२) पुनवा
पुणे नगर वाचनमंदिराचा हा दिवाळी अंक नामवंत लेखकांच्या साहित्याने सजला आहे. मराठी व्याकरणाच्या अभ्यासक यास्मीन शेख व डोअर स्टेप स्कूलच्या संस्थापक प्रा. रजनी परांजपे यांच्या कीर्ती मुळीक यांनी घेतलेल्या विशेष मुलाखती विशेष रंगल्या आहेत. मंगला गोडबोले, नीलिमा गुंडी, डॉ. लिली जोशी, मिलिंद जोशी, राजीव तांबे, स्नेहा अवसरीकर, ल. म. कडू, फारुक काझी, वंदना बोकील कुलकर्णी, अनघा केसकर, मृणालिनी चितळे, रेणू गावस्कर, नीलिमा बोरवणकर आदींचे लेख अंकात आहेत. अंजली कुलकर्णी, मंदा खांडगे, आश्‍लेषा महाजन, प्राजक्ता वेदपाठक आदींच्या कविता आहेत. त्याचबरोबर पारितोषिकप्राप्त कथा, निबंध व ‘अलक’चाही समावेश अंकात आहे.
संपादक ः मधुमिलिंद मेहेंदळे, पाने ः ११६
३) एकमेव वेगळा ः
या दिवाळी अंकाचे हे पहिलेच वर्षे आहे. साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक भान आदी विविध क्षेत्रातील वेगळे प्रयोग तसेच वेगळे व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तींवर या अंकात लेख आहेत. योगिनी वेंगुर्लेकर, संजीव ठकार, निलीमा बोरवणकर, हेमा देवरे, शरद वर्दे, रेवती भागवत, वैशाली बापट, प्रमोद कोलवाडकर आदींच्या कथांनी अंक सजला आहे. प्रमोद काळे, सानिया, मीना वैशंपायन, दीपक घारे, गणेश मतकरी, आनंद नाडकर्णी, मंगला खाडीलकर, मीना नेरुरकर, आशा साठे, कौमुदी वाळिंबे, स्मिता लेले आदींचे विविध विषयावरील लेख आहेत. ‘अनवट सिनेवाटा’ यावर राजश्री बिराजदार यांनी लिहिले आहे.
संपादक ः प्रकाश पानसे, पाने ः १९२, किंमत ः २५० रुपये

४) धनश्री
लेख, कविता, व्यंग्यचित्रे, कथा अशा विविध प्रकारच्या साहित्याने हा दिवाळी अंक सजला आहे. डॉ. संजीव देशपांडे यांनी गावाकडच्या संस्कृतीवर लेखन केले आहे. डॉ. दीपक शिकारपूरकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होणाऱ्या परिणामांवर भाष्य केले आहे. विशाखा पवार यांनी वैदर्भीय फराळाची माहिती दिली आहे. विष्णू मनोहर यांनी अमेरिकन खाद्यसंस्कृतीची वैशिष्ट्ये मांडली आहेत. संदीप तापकीर यांनी पुरंदर किल्ल्याची माहिती दिली आहे. दीपक हरणे यांनी कोरोनानंतरच्या पर्यटन क्षेत्रातील बदलांवर भाष्य केले आहे. कविता विभागात आनंद देशमुख, मानसी चाफेकर, डॉ. शीतल मालुसरे, विशाखा एकताटे, स्वप्ना अमृतकर, योगिता पाखले यांच्या कवितांचा समावेश आहे.
संपादक ः शिवाजी घोडे, पाने ः ९६, किंमतः १९९ रुपये
----*---
५) द इनसाईट
राजकीय, सामाजिक घडामोडींवर भाष्य करणारी वैचारिक मेजवानी या अंकाद्वारे वाचकांना मिळणार आहे. सचिन परब यांनी ‘महापॉलिटिक्सः फॅक्ट आणि फॅक्टर’ या लेखाद्वारे वर्तमानातील विविध घडामोडींचा धांडोळा घेतला आहे. सध्याच्या बहुचर्चित आरक्षण या विषयाचे विविध कंगोरे डॉ. सुहास पळशीकर यांच्या मुलाखतीत वाचायला मिळतात. डिजिटल दुनियेची सफर प्रथमेश जोशी यांनी घडवून आणली आहे. तेलंगणाचे सविस्तर वृत्त रेणुका कल्पना यांनी मांडले आहे. अभिजित कोळपकर यांनी श्रीमंतीमागचे वास्तव उलगडले आहे. सेक्स्टॉर्शनच्या मोहजालाचे वास्तव समीर करंबे यांनी मांडले आहे. श्‍याम पेठकर यांच्या कथेचाही अंकात समावेश आहे.
संपादकः सचिन परब, पाने ः १४४, किंमत ः २५० रुपये.

---------------
६) भूमिका
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने यंदाच्या ‘भूमिका’ दिवाळी अंकात तेजोदीप हा खास विभाग घेण्यात आला आहे. डॉ. श्रीपाल सबनीस, दादासाहेब कोरेकर, प्रणाली मराठे, गीतांजली गायकवाड आदींनी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आहे. याखेरीज, अहिल्याबाई होळकर, अण्णा भाऊ साठे, बाबा महाराज सातारकर, देव आनंद, जयश्री गडकर यांच्यावरील लेख वाचनीय आहेत. अंकाचे काव्यदीप हे वाचकप्रिय सदर सुमारे ७० हून अधिक कवितांनी उजळले आहे.
संपादक ः रूपाली अवचरे, पाने ः १७६, किंमत ः २२० रुपये

७) गावाकडच्या आठवणी
ग्रामगौरव मासिकातर्फे प्रबोधन व मनोरंजन असा परिपूर्ण दिवाळी अंक आहे. ग्रामीण भागातील पार्श्‍वभूमी असणाऱ्या विविध क्षेत्रांतील कर्तबगार व्यक्तींचे त्यांच्या गावाकडच्या आठवणींचे लेख अंकात आहेत. डॉ. ज्ञानेश्वर मुळे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, अनिल कवडे, संदीप दिवाण, विद्या गायकवाड आदींनी लेखन केले आहे. ‘गाव म्हणजे जगण्याचा उत्सव’ हे सूत्र सर्वांच्याच अनुभव कथनात प्रकर्षाने आले आहे. याशिवाय, ‘राहून गेले काही’ यामध्ये अजित कडकडे, अजय पूरकर, स्पृहा जोशी, सायली संजीव आदींचे लेख आहेत.
समूह संपादक ः विवेक ठाकरे, पाने ः ११६, किंमत ः १९९ रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Chandoli Dam Tourists : चांदोली धरणावर दारू पिऊन धिंगाणा घालताय? सावधान! पोलिस, धरण प्रशासन ॲक्शन मोडवर; मद्यधुंद पर्यटकांवर अंकुश

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

SCROLL FOR NEXT