पुणे

भिडे वाड्याच्या पुर्नविकासासाठी वास्तुविशारदांकडून आराखडे सादर

CD

पुणे, ता. २८ ः महापालिकेने भिडे वाड्याच्या पुर्नविकासासाठी शहरातील वास्तुविशारदांकडून आराखडे मागविले होते, त्यानुसार आत्तापर्यंत तीन नामवंत वास्तुविशारदांकडून आराखडे आले आहेत. आराखड्यांचे महापालिका आयुक्तांसमोर सादरीकरण झाल्यानंतर एका आराखड्याची निवड केली जाणार आहे.


दरम्यान, भिडे वाड्याची जागा ३ डिसेंबरपर्यंत महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिलेले असताना आता, जागामालक व भाडेकरूंनी ताबा देण्यास मुदतवाढ मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, मात्र महापालिकेने त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये बुधवार पेठेतील भिडे वाड्यामध्ये मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती. दरम्यान, भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी शहरात आंदोलने सुरू होती. त्याची दखल घेत २००८ मध्ये पुणे महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये महापालिकेकडून भिडे वाडा ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जागामालक, भाडेकरू न्यायालयात गेल्याने हा प्रश्‍न न्यायप्रविष्ट होता. महापालिकेने १३ वर्षे न्यायालयीन लढा दिल्यानंतर मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेला जागा ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, भिडे वाड्याच्या जागेत राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरवात केली होती. तेथे भव्य कौलारू वाडा, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, बहुउद्देशीय हॉल, ग्रंथालय, सभागृह अशा प्रकारच्या रचनेचा आराखडा महापालिकेने वास्तुविशारदांकडून मागविला होता.
------------
भिडे वाड्याच्या जागेचा ३ डिसेंबरला महापालिका ताबा घेणार आहे. त्यापूर्वीच घरमालक, भाडेकरू यांनी ताबा देण्यास मुदतवाढ मिळण्यासाठी न्यायालयात याचिका सादर केली आहे, परंतु, आम्ही त्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. - विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

Online Gaming करताय? तर तुमच्या मोबाईलमध्ये असली पाहिजे 'ही' एक गोष्ट, मोठ्या धोक्यांपासून करेल सुरक्षा

'मला मूल नको होतं' पूजा भट्टने सांगितलं घटस्फोट घेण्याचं कारण, म्हणाली...'नात्यात एकटेपणा हा...'

Rainwater Harvesting: आदर्श मान्याचीवाडी होणार आता पाण्याचीवाडी; घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचे पाणी साठवणाऱ्या घरांचीच होणार नोंद

समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या ‘समर्थ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित !

SCROLL FOR NEXT