पुणे

मॅरेथॉन बातमी

CD

पुणे हाफ मॅरेथॉनला
धावपटूंचा उदंड प्रतिसाद
पुणे, ता. २८ ः बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनसाठी पुणेकरांनी काऊंटडाऊन सुरु केले आहे. येत्या दहा डिसेंबर रोजी होणाऱ्या या शर्यतीला धावपटूंनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
विविध कंपन्या, उद्योगसमूह, धावपटूंचे स्थानिक ग्रुप अशा पातळ्यांवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोलिस कमिशनर कप स्पर्धेचे आकर्षण ठरला असून यंदाही राज्यभरातून पोलिसांचे संघ सहभागी होणार आहेत. यात महिला पोलिस संघांचाही समावेश असेल.
गृहनिर्माण संस्थांमधील नागरिकांचा सहभाग हे शर्यतीचे वैशिष्ट्य ठरले आहे. या शर्यतीत धावपटूंना सर्वोत्तम वेळ नोंदविता यावी म्हणून १० किमी शर्यतीसह हाफ मॅरेथॉनसाठी पेसर्स असतील. त्यासाठी ५० हून जास्त धावपटूंनी संयोजकांकडे नावनोंदणी केली आहे.
मोफत प्रशिक्षण
संयोजकांच्यावतीने शहरातील सहा ठिकाणी मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे आठवड्यातून तीन दिवस सकाळी सहा ते सात या वेळेत धावपटू ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. ही ठिकाणे अशी ः
१) बाणेर ः शहीद अशोक कामठे उद्यान, पिंपळे निलख, ज्युपिटर हॉस्पिटलजवळ, ट्रेनर ः परेश.
२) पुणे विद्यापीठ ः बास्केटबॉल कोर्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ट्रेनर ः स्वरूपा
३) कर्वेनगर ः राधाबाई टोळ सभागृह बॅडमिंटन हॉल, नवसह्याद्री सोसायटी, म्हात्रे पुलाजवळ, ट्रेनर ः अमित गडनीस.
४) कल्याणी नगर ः जॉगर्स पार्क, नॉर्थ अव्हेन्यू, ट्रेनर ः विद्येश खटावकर.
५) मगरपट्टा ः मगरपट्टा इनर सर्कल, सायबरसिटी, अतिश पाटील.
६) कोथरूड ः जीत ग्राउंड अँड ओपन लायब्ररी, लोकमान्य कॉलनी. ट्रेनर ः विनया मालुसरे
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT