terror in Peth esakal
पुणे

Pune Crime News : नाना पेठेमध्ये कोयते दाखवत दहशत

कोयता गँगमधील गुन्हेगारांना पोलिसांनी बेदम चोप दिल्याच्या घटनेनंतर शहरात पुन्हा कोयते हातात घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोयता गँगमधील गुन्हेगारांना पोलिसांनी बेदम चोप दिल्याच्या घटनेनंतर शहरात पुन्हा कोयते हातात घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार सुरूच आहे. दुचाकीवर आलेल्या गुन्हेगारांनी कोयते हवेत फिरवत नागरिकांमध्ये दहशत माजविण्याची घटना नाना पेठेत घडली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

या संदर्भात पोलिस ठाणे अंमलदार हेमंत पेरणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून समर्थ पोलिस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गगनदीप मिशन (वय १९), अमन खान (वय २२, दोघे रा. नाना पेठ), अरसलन तांबोळी (वय २७), मंगेश चव्हाण (वय २४) आणि गणेश पवार (वय २७, तिघे रा. रविवार पेठ) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

तर, अन्य पाचजण फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जानेवारीला पहाटे दोन गटांमध्ये भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून सकाळी सहाच्या सुमारास नाना पेठ परिसरात दहाजण दुचाकींवर आले. त्यांनी कोयते हवेत फिरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून पाचजणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना मंगळवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या आरोपींचा कोयता गॅंगशी संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे आणि उपनिरीक्षक सौरभ माने पुढील तपास करीत आहेत.

गुन्हेगारांची गय नाही!
कोणत्याही गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. कठोर कारवाई करण्यात येईल. गुन्हेगारांच्या दहशतीबद्दल नागरिकांनी न घाबरता पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT