पुणे

म्हाडाकडे पहिल्या दिवशी ४४०० अर्ज दाखल

CD

पुणे, ता. ५ : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत पाच हजार ९९० सदनिका विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेला गुरुवारी सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत सुमारे चार हजार ४०० अर्जदारांनी नोंदणी प्रक्रियेस सुरवात केली.
पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांच्या हस्ते ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याच्या मोहिमेस सुरवात झाली. म्हाडातर्फे तयार करण्यात आलेले ‘आयएचएलएमएस 2.0’ या नूतन संगणकीय ॲप चा वापर करून घरांसाठी अर्ज मागविणारे पुणे मंडळ हे म्हाडाचे राज्यातील पहिले मंडळ ठरले आहे. नव्या प्रक्रियेनुसार नोंदणी दरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे म्हाडाच्या विविध मंडळांच्या संगणकीय सोडतीतील कायमस्वरूपी आता पात्र अर्जदार ठरणार आहेत. पुणे मंडळाच्या सदनिकांची संगणकीय सोडत १७ फेब्रुवारी होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अल्प, अत्यल्प आणि उच्च गटातील घरांच्या सोडत काढण्यात आली आहे. नागरीकांना म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर नागरीकांना नोंदणी करता येणार आहे.

अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर पुस्तिका, व्हिडिओ, हेल्प फाइल आणि हेल्प साइट या वेबसाइटवर उपलब्ध केल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती जाणून घ्यावी. आज पहिल्या दिवशी चार हजार ४०० जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
- नितीन माने, मुख्य अधिकारी, म्हाडा
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT