पुणे

तीन सहायक आयुक्तांना दणका

CD

पुणे, ता. ७ ः पुणे शहरातील फ्लेक्सबाजीला आवर घालण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या परिमंडळ दोनमधील तीन सहायक आयुक्तांना एक हजार रुपयांचा दंड आणि सेवा पुस्तकात नोंद अशी शिक्षा करण्यात आली आहे. त्यानंतर आता परिमंडळ चारमधील क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांवरही कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, ही कारवाई महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या आदेशाने करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे शहरातील प्रत्येक चौकात, रस्त्यावर राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, व्यावसायिकांकडून मोठमोठे फ्लेक्स लावले जात आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. शहरात १५ ते १७ जानेवारी या कालावधीत ‘जी २०’ परिषदेच्या बैठका होणार आहेत. या वेळी देश-विदेशातील प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याने शहर स्वच्छतेसाठी विशेष लक्ष दिले जात आहे. यापूर्वीच सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आपल्या हद्दीत बेकायदा फ्लेक्स, होर्डिंग, बॅनर, झेंडे लावू देऊ नयेत, तसेच लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करावा, असा आदेश खुद्द महापालिका आयुक्तांनी दिला आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र सहायक आयुक्तांनी फ्लेक्सविरोधात कारवाई करू, असे आश्‍वासन दिल्याने ही कारवाई तात्पुरती टळली होती. मात्र त्यानंतरही सुधारणा न झाल्याने कारवाई करण्यात आली आहे.
फ्लेक्सवर कारवाई न केल्याने परिमंडळ दोनमधील शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय आणि कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना एक हजार रुपयांचा दंड आणि सेवा पुस्तकात नोंद अशा स्वरूपाची शिक्षा केली आहे. त्याचप्रमाणे पुढील टप्प्यात परिमंडळ चारमधील वानवडी-रामटेकडी, हडपसर-मुंढवा आणि कोंढवा-येवलेवाडी येथील सहायक आयुक्तांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी बेकायदा होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर, बोर्ड, पोस्टरकडे दुर्लक्ष करत असल्याने आता नागरिकांनाच तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी १८००२३३६६७९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

PNE23T16798

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामान खात्याची मोठी माहिती

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT