पुणे

शहर स्वच्छतेला पुणेकरांचा हातभार

CD

पुणे, ता. ८ ः ‘जी 20’ परिषदेच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना शहराचे अनोखे दर्शन घडावे, यासाठी महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या सहभागातून रविवारी सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील १५० हून अधिक ठिकाणी ही मोहीम पार पडली, त्यामध्ये विविध स्वयंसेवी संस्था, नागरीकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
शहरामध्ये आगामी आठवड्यात ‘जी 20’ परिषद होणार आहे. त्यामध्ये विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्वच्छ व सुंदर शहर असा शहराचा संदेश जगभर पोचावा, यादृष्टीने महापालिका प्रशासनाने स्वच्छतेवर भर दिला आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छता मोहिमेचे रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत आयोजन केले होते. या मोहिमेचे उद्‌घाटन शनिवार वाड्याच्या प्रांगणात झाले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विकास ढाकणे म्हणाले की, जी 20 परिषदेला पुण्यात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना पुणे शहराचे अनोखे दर्शन घडवण्यासाठी आपण सारे कटिबद्ध आहोत. त्यादृष्टीने शहर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.’’ यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली.

दृष्टिक्षेपात मोहीम
- सहभागी नागरिक, विद्यार्थी, तरुणांनी शनिवारवाडा प्रांगण आणि अंतर्गत भागामध्ये सफाई मोहीम राबवली
- शहराच्या विविध भागातील महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील १५० हून अधिक ठिकाणी ही स्वच्छता मोहीम
- प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांबरोबरच पर्यटन स्थळे, सार्वजनिक उद्याने, प्रमुख चौकांचा समावेश
- विविध स्वयंसेवी संस्था आणि संघटनांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT