पुणे

आयसीयूमध्ये उपचारादरम्यान रुग्ण भाजला

CD

पुणे, ता. १० : अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत असलेला रुग्ण गरम पिशवीतील पाणी लिकेज होऊन गंभीररीत्या भाजल्याची घटना कोरेगाव पार्क येथील इनलॅक्स ॲड बुधराणी हॉस्पिटलमध्ये घडली. हिरालाल सारवान (वय ७०, रा. गजानन सोसायटी, दौंड) असे जखमी रुग्णाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा अ‍ॅड. सुरेश सारवान यांनी नऊ जानेवारी रोजी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून हॉस्पिटलमधील एका डॉक्टरसह नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल सारवान हे रेल्वे खात्यात जमादार पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. ४ जानेवारी रोजी त्यांचा रस्ते अपघात झाला. त्यामुळे उपचार घेण्यासाठी ते दौंड रेल्वे रुग्णालयात दाखल झाले. सिटी स्कॅनमध्ये त्यांच्या डोक्यात रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाल्याने त्यांना इनलॅक्स ॲण्ड बुधराणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून उपचारासाठी त्यांना आयसीयूमध्ये ठेवले होते. त्या रात्री त्यांचे कुटुंब मुक्कामासाठी नातेवाइकांकडे गेले. दुसऱ्या दिवशी फिर्यादी आईसमवेत वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्यावर त्यांना वडील बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्या पोटावर, हातावर आणि गुप्तांगावर भाजल्याच्या खुणा होत्या. याबाबत त्यांनी डॉ. महेश कुमार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी गरम पाण्याची पिशवी लिकेज झाल्याने रुग्णाला भाजल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादी व त्यांच्या सहकारी वकिलांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात जाऊन घडला प्रकार सांगत डॉक्टर आणि नर्सविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT