पुणे

ताप, खोकल्याकडे नको दुर्लक्ष

CD

पुणे, ता. १० : चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे नवीन रुग्ण आढळले नसले तरी, शहरात कोरडा खोकला, सर्दी, विषाणूजन्य ताप आणि उलट्या या प्रमुख तक्रारी असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले. गेल्या दोन आठवड्यांपासून ही रुग्णसंख्या वाढत असून यामध्ये लहान मुले आणि ज्येष्ठांचा समावेश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हवामान बदलाचा त्रास
बदलत्या हवामानामुळे विषाणूजन्य आजाराचे काही रुग्णांना निदान होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बहुतेक मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती या वारंवार होणाऱ्या हवामान बदलाचा त्रास होताना दिसून येत आहे. दररोज १० ते १२ रुग्ण कोरडा खोकला आणि तापाच्या तक्रारींसह रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


...तर संसर्गजन्य आजार वाढेल
अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील डॉ. सम्राट शहा म्हणाले, ‘‘ऋतू बदलत असताना संसर्गाचा, विशेषत: विषाणूजन्य संसर्गामध्ये वाढ होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सर्दी, खोकला, अपचन, तापाचे रुग्ण अधिक प्रमाणात उपचाराकरिता दाखल होत आहेत. चीनमध्ये कोरोना संसर्गामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्दी-खोकल्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोना प्रतिबंधक लशीचे बूस्टर डोस घेतल्याने पुन्हा कोरोना होणार नाही, असा गैरसमज करून घेऊ नका. त्यामुळे सर्दी, ताप आणि खोकला अधिक दिवस राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. हिवाळ्यात नागरिकांनी काळजी न घेतल्यास संसर्गजन्य आजार वाढू शकतात.’’

कोरड्या हवेत संसर्ग जलदगतीने होतो. त्यामुळे एकापासून दुसऱ्याला संसर्ग वेगाने होतो. हिवाळ्यातील आजाराची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. आजारी पडल्यानंतर दोन आठवड्यांपर्यंत संक्रमणाची शक्यता असते.
- डॉ. जगदीश काथवटे,
बालरोगतज्ज्ञ, मदरहु रुग्णालय

यांनी जास्त काळजी घ्यावी
१) प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण
२) ज्येष्ठ नागरिक
३) लहान मुले
४) गर्भवती
५) मधुमेही, मूत्रपिंड विकाराचे रुग्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT