पुणे

पुणे स्टेशनवरून मुलाला पळविणाऱ्यास अटक

CD

पुणे, ता. १२ : दारूच्या नशेत असलेल्या महिलेला चुकवून एकाने तिच्या सहा वर्षांच्या मुलाला पळवून नेल्याची घटना पुणे स्टेशन येथे घडली. पोलिसांनी आरोपीला गुलबर्गा येथून अटक करून मुलाला ताब्यात घेतले आहे.
इक्बाल हसन शेख (वय ३२, रा. पेडगाव, जि. कोल्हापूर, सध्या रा. गुलबर्गा) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला ही पिंपरी येथील असून, तिला दारूचे व्यसन आहे. ती आपल्या मुलासह ९ जानेवारीला पुणे स्टेशन येथे आली होती. तेथे तिने इक्बाल शेख याच्यासोबत दारू प्यायली. नशेत झोपी गेल्यानंतर आरोपी शेख हा तिच्या मुलाला घेऊन पसार झाला. महिलेला पहाटे जाग आल्यानंतर मुलगा सोबत नसल्याचे लक्षात आले. या महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. तसेच, तांत्रिक तपासाच्या मदतीने शोध घेतला तेव्हा आरोपीने मुलाला गुलबर्गा येथे नेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी गुलबर्गा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी इक्बाल शेख याला अटक करून मुलाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! ममता बॅनर्जींचं मंत्रिमंडळ बरखास्त; राजीनामा देण्यास दीदींचा नकार, राज्यपालांचा मोठा निर्णय

Nashik ZP Elections Mahayuti : जिल्हा परिषद, पंचायत समिती 'महायुती' एकत्रित लढविणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Virar Flyover: विरारकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चौपदरी नारंगी उड्डाणपूल ८ मे रोजी लोकार्पण होणार

10th Exam Result: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाचा SSC निकाल ८ मे रोजी लागणार; ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार

SCROLL FOR NEXT