पुणे

स्वयंभू नेतृत्व गेल्याने समाजाची हानी

CD

पिंपरी, ता. १४ : जमिनीशी जोडलेले, लोकांशी जोडलेले स्वयंभू नेतृत्व गेल्यावर समाजाची हानी होते. परंतु; त्यांच्याकडून प्रेरणाही मिळते. भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराला मदत करण्याची दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे स्वप्न होते. आपण ते स्वप्न पूर्ण केले पाहिजे. राज्य सरकारच्यावतीने जिल्हा नियोजन माध्यमातून या मंदिरासाठी पाच कोटी रुपये देऊ, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. १४) चिंचवड येथे दिले.
दिवंगत आमदार जगताप यांना प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सर्वपक्षीयांच्यावतीने शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी फडणवीस बोलत होते. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, बाळा भेगडे, अविनाश महातेकर, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप, भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ॲड. सचिन भोसले, मनसेचे बाबू वागसकर, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, दिलीप बंड आदि यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाने विधी महाविद्यालय सुरु केले जाईल. विलास लांडे यांनी मागणी केली; त्याला चंद्रकांत पाटील यांनी मंजुरी दिली. महापालिकेच्यावतीने कर्करोग रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे, आमदार महेश लांडगे यांच्या मागणीनुसार या रुग्णालयालाही लक्ष्मण जगताप यांचे नाव देण्यात येणार आहे.
‘लक्ष्मण पर्व’ या ‘सकाळ’च्या कॉफी टेबल बुकचा उल्लेखही फडणवीस यांनी भाषणात केला.

गिरीश महाजन, श्रीरंग बारणे, अण्णा बनसोडे, भाई जगताप, भाऊसाहेब भोईर, मानव कांबळे, मारुती भापकर व शहरातील विविध पक्ष, संघटना, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार जगताप यांना श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. बी. के. कोकटे यांनी सूत्रसंचालन केले. महेश लांडगे यांनी आभार मानले.

PNE23T18433

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Admapur land Scam : लाखात घेतली, कोट्यवधींना देवस्थानला विकली; बाळूमामा ट्रस्ट जमिनीत 11 कोटींचा गैरव्यवहार, पाच मध्यस्थींना केली अटक

Shiv Sena Political Clash : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी 'युद्ध'; दिशा सालियन प्रकरणाला 'गद्दारी'वरून प्रत्‍युत्तर, वादग्रस्त विषयांना पोलिस परवानगीने आश्चर्य

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

SCROLL FOR NEXT