पुणे

वर्ल्ड कप क्रिकेट मिरवणूक

CD

येत्या मंगळवारी पुण्यात
विश्वकरंडकाची मिरवणूक
पुणे, ता. २२ : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने येत्या मंगळवारी (ता. २६) क्रिकेटच्या विश्वकरंडकाची भव्य मिरवणूक पुण्यात आयोजित केली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी याविषयी अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पाच ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरु होत आहे. विशेष बाब म्हणजे तब्बल २७ वर्षानंतर पुण्यात पुरुषांच्या विश्वकरंडकाचे सामने होणार आहेत. आम्हाला पाच सामन्यांचे यजमानपद मिळाले आहे. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर १९ ऑक्टोबरचा बांगलादेशविरुद्धचा सामना आकर्षण असेल. पुण्यातील क्रिकेटप्रेमींना विश्वकरंडक प्रत्यक्ष बघता यावा आणि सेल्फी सुद्धा काढता यावा म्हणून आम्ही शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रम ठेवला आहे. आपले आंतरराष्ट्रीय खेळाडू, पदाधिकारी, महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधव, ऋतुराज गायकवाड तसेच आजी-माजी खेळाडू यांच्या उपस्थितीत मिरवणूक निघेल. दुपारी एक वाजता सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिएट पासून सिंबायोसिस कॉलेज, बीएमसीसी कॉलेज, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज येथून फर्ग्युसन रस्त्याने कृषी महाविद्यालयापर्यंत असा मार्ग असेल. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ४.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान क्रिकेटरसिकांना विश्वकरंडक बघता येईल."
या मिरवणुकीत सुपरबाईक रॅली, सायकल रॅली, ढोल-ताशा पथक आणि फ्लॅश मॉब हे विशेष आकर्षण असेल. यावेळी क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र होणार, जगाला भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल; मोदींचं मोठं स्वप्न!

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT