mhada home
mhada home sakal
पुणे

MHADA Homes : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ; नागरीकांना २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : म्हाडाने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पाच हजार ८६३ सदनिकांसाठी काढलेल्या सोडतीमध्ये आतापर्यंत ३२ हजार नागरीकांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, गणेशोत्सव व कार्यालयीन सुट्टींमुळे अधिवास प्रमाणपत्र अथवा इतर आनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यास नागरिकांना येत असलेली अडचण लक्षात घेऊन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यामुळे नागरीकांना २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

म्हाडाचे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत गुरुवार (ता.२८) सप्टेंबरपर्यंत होती. गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, पंतप्रधान आवास योजनेतील ४३१ सदनिका, १५ टक्के सामाजिक गृहयोजनेतील ३४४ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील दोन हजार ४४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत दोन हजार ४४५ सदनिका, अशा एकूण ५ हजार ८६३ सदनिकांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी ५ सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

पाटील म्हणाले, ‘‘अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र, असे पुरावे ऑनलाइन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिक बाहेरगावी गेले असल्याने तसेच शासकीय सुट्टी असल्याने नागरिकांना प्रमाणपत्रे मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे अनेक अर्जदारांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. अर्जदारांची या अडचणी लक्षात घेऊन सोडतीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.’’

सोडतीचे सुधारित वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नोंदणीची अंतिम मुदत-२० ऑक्‍टोंबर
ऑनलाइन पेमेंट, अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुदत-२१ ऑक्‍टोंबर
सोडतीसाठी अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध-२७ ऑक्‍टोंबर
सोडतीसाठी अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध-३ नोव्हेंबर
सोडत-९ नोव्हेंबर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT