pune traffic  sakal
पुणे

Pune Traffic : कोंडी फोडण्यासाठी तातडीने पर्यायी मार्ग

विद्यापीठ चौक; ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल, आयुक्तांकडून ठिकाणांची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मेट्रो आणि उड्डाण पुलाच्या कामामुळे आनंद ऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) आणि गणेशखिंड रस्त्यावर वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विद्यापीठ चौक ते महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद संस्था असा पर्याची मार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी परिषदेने जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच मॉडर्न शिक्षण संस्थेने केवळ दुचाकी वाहतुकीसाठी परवानगी द्यावी, याबाबत चर्चा केली जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

या चौकासह परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीबाबत ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. ६) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या. आयुक्त विक्रम कुमार यांनी आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह गणेशखिंड, बाणेर आणि औंध रस्त्याची पाहणी करून येथील कामांचा आढावा घेतला. औंधकडून शिवाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील दुचाकी, चारचाकी वाहने पुणे विद्यापीठ चौकात न येता ती विद्यापीठाच्या आवारातून पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहेत.

राजभवनाच्या समोर विद्यापीठाचे मिलेनियम प्रवेशद्वार आहे. तेथून मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारून स्वामी विवेकानंद शाळा, वैकुंठभाई मेहता संस्था येथून महाराष्ट्र कृषी आणि संशोधन परिषद येथे हा रस्ता जाणार आहे. तेथून वाहनचालकांना शिवाजीनगरच्या दिशेने जाता येणार आहे. हा रस्ता ६ मीटर रुंदीचा केला जाणार आहे. यामुळे अंतर वाढणार असले तरी विद्यापीठ चौकातील कोंडी कमी होण्यास मदत होईल. उड्डाण पुलाचे काम सुरू झाल्यानंतर बॅरिकेडिंग केल्याने वाहनांसाठी पुरेसा रस्ता उपलब्ध होणार नाही, त्यामुळे भूसंपादन व इतर पूरक कामांना गती देण्यात आली आहे.

जुन्या सीमाभिंती पाडणार
गणेशखिंड रस्त्यावरील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, एनआयसीची जागा ताब्यात आलेली नाही. इतर शासकीय, खासगी कार्यालयांच्या जागा, बंगल्यांच्या जागा ताब्यात आल्या आहेत. या जागामालकांना नवीन सीमाभिंत बांधून दिली जात आहे, हे काम पूर्ण झाल्यानंतर जुन्या सीमाभिंती पाडून रस्ता ४५ मीटरचा केला जाणार आहे. त्याच वेळी विविध सेवा वाहिन्याही स्थलांतरित केल्या जातील. ही सर्व कामे १० नोव्हेंबरपूर्वी पूर्ण केली जातील, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

संस्थेची चर्चा करणार
सेनापती बापट रस्त्यावरून येणारी वाहने पाषाणकडे जाण्यासाठी मॉडर्न महाविद्यालयाच्या जागेतून रस्त्याचे नियोजन होते. पण विद्यार्थ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा रस्ता झाला नाही. मात्र सायंकाळी दोन ते तीन तास येथून वाहने गेल्यास विद्यापीठ चौकातील वाहनांची संख्या कमी होऊ शकते. त्यासाठी मॉडर्न महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे आयुक्त म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT