Vijay Wadettiwar sakal
पुणे

Pune News : विशेष तपास पथकामार्फत ‘ससून’मधील गैरप्रकाराची चौकशी करा - विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार यांची मागणी : ‘ससून’मधील गैरप्रकाराची गंभीर दखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘ससून रुग्णालय हे आरोग्य सेवा देणारे रुग्णालय आहे की गुन्हेगारांचा अड्डा, असा प्रश्न पडला आहे. रुग्णसेवेच्या नावाखाली रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे. याला जबाबदार कोण? गंभीर स्वरूपाचे आरोप असलेले गुन्हेगार रुग्णालयात मजा मारत असून येथून आपले धंदे चालवत आहेत. हे सर्व करण्याची हिंमत राजकीय राजाश्रयाशिवाय शक्य नाही. त्यामुळे सरकारने या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) त्वरित चौकशी करावी,’’ अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

पुणे दौऱ्यावर आलेले असताना वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ससून रुग्णालयातील गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. राजकारणाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून या राज्यांमध्ये काँग्रेस भक्कम आहे. तर काही राज्यांमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशी थेट लढाई आहे. त्यात आताच्या सर्वेक्षणानुसार पाचही राज्यात काँग्रेस बहुमताने येईल.’’

खासगीकरणाला विरोध...
‘‘कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात यापूर्वी विरोधी पक्ष म्हणून आवाज उठविला आहे. हा निर्णय आरक्षण आणि गुणवत्तेच्या मुळावर उठणारा आहे. कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय रद्द करावा, ही मागणी लावून धरली आहे. शाळांचे खासगीकरण आणि महाबळेश्वरमधील ग्रामीण रुग्णालयाचे खासगीकरणाला विरोध आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

‘भाजपला दिसतोय पराभव’
‘‘चंद्रपूर असो किंवा पुणे येथील पोटनिवडणूक होत नाही, कारण या दोन्ही ठिकाणी भाजपला सपशेल पराभव दिसत होता. भाजपने केलेल्या चार वेगवेगळ्या सर्वेक्षणातून त्यांचा पराभव निश्चित होता. त्यामुळे दोन्ही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचा दावा वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्रिपद, पालकमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद कोणाला द्यायचे, एक ‘दादा’ दुसऱ्या ‘दादा’वर वरचढ ठरतोय, हे सध्याचे राज्याचे राजकारण आहे. हे राजकारण राज्याचा सत्यानाश करण्यासाठी सुरू आहे. आताच्या काळात प्रचंड निविदा काढल्या जात आहेत. त्यातून सरकारी तिजोरीची प्रचंड लूट सुरू असून वस्तादांची टोळी राजरोजसपणे सरकारी तिजोरीची लूट करत आहे.
- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

SCROLL FOR NEXT