पुणे

पुणे ३४.४ अंश सेल्सिअस

CD

पुणे, ता. १३ ः पहाटे धुके अन् दिवसभर उन्हाचे चटके, पुणे शहर व परिसरात सध्या हवामानाची स्थिती अशीच कायम आहे. एकीकडे मॉन्सून पुण्यातून परतला असून दुसरीकडे हवामान कोरडे असल्याने शहरातील कमाल तापमान वाढ होत आहे. यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत.
शहरात शुक्रवारी (ता. १३) ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा तापमानात वाढ कायम असून दिवसा उन्हाचा ताप देखील वाढला आहे. मात्र, रात्रीच्या वेळी काहीसा गारवा देखील जाणवत असून पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात उन्हाचा चटका असाच कायम राहण्याचा अंदाज आहे.
राज्यातही हवामानाची स्थिती अशीच असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अकोला येथे ३७.५ अंश सेल्सिअस इतकी झाली. राज्यातील बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान हे ३५ अंश व त्यापेक्षा पुढे आहे. विदर्भात तर उन्हाचे चटके अधिक वाढले असून राज्यात ऑक्टोबर हीटचा प्रभाव कायम आहे. सध्या पावसाचे सावट नसून निरभ्र व कोरड्या हवामानामुळे राज्यात शनिवारी (ता. १४) उन्हाचा ताप सहन करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT