पुणे

पुण्याहून अजनी, गोरखपूरसाठी विशेष रेल्वे

CD

पुणे, ता. १३ ः मध्य रेल्वे प्रशासनाने सण, उत्सवांच्या काळात वाढती गर्दी लक्षात घेता विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुण्याहून अजनी व गोरखपूर या दोन रेल्वेचा समावेश आहे.

पुणे-अजनी एक्स्प्रेस १७ ऑक्टोबरपासून ते २८ नोव्हेंबरपर्यंत धावेल. पुण्याहून (गाडी क्रमांक ०२१४१) दर मंगळवारी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी अजनीला पोचणार आहे. अजनी-पुणे एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०२१४२) दर बुधवारी अजनी येथून रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी पुण्याला पोचेल. दौंड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा आदी स्थानकावर थांबा देण्यात आला.

पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस ही २० ऑक्टोबरपासून ते १ डिसेंबरपर्यंत धावेल. पुण्याहून (गाडी क्रमांक ०१४३१) दर शुक्रवारी दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता गोरखपूरला पोचेल. गोरखपूर हुन (गाडी क्रमांक ०१४३२) दर शनिवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी सुटेल. तिसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पुण्याला पोचेल. गाडीला दौंड कॉड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद आदी स्थानकावर थांबा देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

SCROLL FOR NEXT