पुणे

ग्रामसेवकांसह अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस इंदापूर तालुक्यातील घटना; सात दिवसांत खुलासा करण्याचा सीईओंचा आदेश

CD

पुणे, ता. १३ ः इंदापूर तालुक्यातील कांदलगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील दहा रस्त्यांची कामे न करताच, ही कामे पूर्ण करून बोगस रेकॉर्ड तयार केले. न केलेल्या रस्त्यांची देयके (बिले) काढल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी शुक्रवारी (ता.१३) तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये प्रत्येकी कनिष्ठ अभियंता, एक तत्कालीन उपअभियंता आणि एका ग्रामसेविकेचा समावेश आहे. याबाबत येत्या सात दिवसांत खुलासा करण्याचा आदेश चव्हाण यांनी दिला आहे.

या तीन अधिकाऱ्यांनी कांदलगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील आठ रस्त्यांची कामे आधीच पूर्ण झालेली असताना, ही कामे नव्याने केल्याचे आणि अन्य दोन रस्त्यांच्या कामांचे काँक्रिटीकरण हे आधीच केलेले असताना, पुन्हा नव्याने केल्याच्या चुकीच्या नोंदी केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. या दहा रस्त्यांची कामे आधीच केलेली असताना सुद्धा ती नव्याने केल्याचे भासवून या कामांची देयके (बिले) अदा केली आहेत.

दरम्यान, याबाबत स्थानिक नागरिकांनी इंदापूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे या रस्त्यांच्या कामाची आणि त्या कामांची देयके अदा केल्याबाबतची फेरतपासणी करण्यात आली. या फेरतपासणीत कामे झाली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला होता. या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. या अहवालातून ही कामे आधीच पूर्ण झालेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये तत्कालीन उपअभियंता बी. एम. जाधव (सध्या सेवानिवृत्त), कनिष्ठ अभियंता रोशन तुमसरे आणि ग्रामसेविका स्वाती लोंढे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : अमेरिका-इराण युद्धामुळे निर्यात होणाऱ्या केळी, द्राक्ष, डाळींबाचे मोठे नुकसान

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT