Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 sakal
पुणे

Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : पुणे हाफ मॅरेथॉनमुळे प्रथमच धावण्याची प्रेरणा

या शर्यतीसाठी शहरातील विविध ठिकाणी अनेक धावपटू पद्धतशीर सराव करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : येत्या रविवारी (ता. १०) होणाऱ्या बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनमुळे अनेक धावपटूंना प्रथमच धावण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे हा दिवस आणि पर्यायाने ही शर्यत त्यांच्यासाठी निर्णायक बिंदू ठरेल.

या शर्यतीसाठी शहरातील विविध ठिकाणी अनेक धावपटू पद्धतशीर सराव करीत आहेत. कर्वेनगर येथील टोळ बॅडमिंटन हॉल येथे अमित गडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली एक गट सराव करीत आहे. यातील अनेक जण प्रथमच पाच किलोमीटर अंतर धावतील. मगरपट्टा येथे आतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका गटाचा सराव सुरु आहे. तेथे

मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे आठवड्यातील तीन दिवस सराव चालतो. यातील बहुतेक जणांनी चाळिशी पार केली आहे. यापूर्वी बहुतेकांनी पद्धतशीर सराव केला नव्हता. बहुतेक विवाहित आहेत. त्यांना शास्त्रशुद्ध सरावामुळे प्रशिक्षणाची गोडी लागली आहे.
मी पहिल्या वर्षापासून या शर्यतीशी जोडला गेलो आहे.

माझे वडील हेमंत यांनी २०१९ मध्ये वयाच्या ७५व्या वर्षी हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. आई शिल्पा हिनेही पाच किमी शर्यत पूर्ण केली. माझी पत्नी मुक्ता एके वर्षी पेसर होती.
अमित गडनीस


पुणे हाफ मॅरेथॉनचे संयोजन उत्तम असते. त्यामुळे आपल्या तंदुरुस्तीची पातळी, क्षमता सहभागी धावपटूंना कळते. नवोदितांना नाव नोंदविले की त्यांना किमान वर्कआऊटची प्रेरणा मिळते.
- आतीश पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

एक्सपायरी संपलेली बिस्किटं अन् कोल्डड्रिंक्सवर नवीन तारीख लावून विक्री, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

See-Wood Farming : ‘सी-वीड’ शेतीतून महिलांची झेप; समुद्रातून उभा राहतोय रोजगार

SCROLL FOR NEXT