पुणे

सैनिक हो तुमच्यासाठी!

CD

पुणे, ता. ३ ः माजी सैनिक अंशदायी आरोग्य सेवा योजना (इसीएचएस) विभागातर्फे ‘इसीएचएस’ लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आता लाभार्थ्यांना विविध आजारांवरील उपचारासाठी ‘रेफरल’ कालावधीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आता त्या कालावधीत उपचार किंवा तपासणी करणे तसेच याच्या खर्चाचा परतावा देखील मिळणार आहे.

काय आहे योजना?
- ‘इसीएचएस’तर्फे माजी सैनिक, त्यांचे कुटुंब तसेच जवानांच्या विधवांसाठी विविध ‘इसीएचएस’ पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरविण्यात येतात
- काही खासगी रुग्णालयांनाही नेमण्यात आले असून त्याद्वारेही लाभार्थ्यांना आरोग्य सेवा पुरवली जाते
- या रुग्णालयात उपचार किंवा तपासणी केल्यावर आलेल्या खर्चाचा परतावा दिला जातो
- मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग अशा विविध आजारांनी ग्रस्त असलेल्यांना पॉलिक्लिनिकद्वारे नेमण्यात आलेल्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जाते
- त्यासाठी एक ठराविक कालावधीची ‘रेफरल’ वैधता दिली जाते

हे लक्षात ठेवा
- मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, डायलिसिस आणि कर्करोगावरील उपचार घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ‘रेफरल’ कालावधी हा १८० दिवसांचा म्हणजेच सहा महिन्यांचा करण्यात आला आहे
- दातांच्‍या समस्येशी निगडित उपचाराकरिता ६० दिवसांपर्यंतची वैधता वाढविण्यात आली आहे
- या ठराविक कालावधीत लाभार्थ्यांना उपचार घेता येणार
- या कालावधीनंतर उपचार घेतल्यास खर्चाचा परतावा मिळणार नाही

...म्हणून वाढविला कालावधी
कालावधी वाढविण्यात आल्यावरही काही पॉलिक्लिनिकद्वारे याचे पालन केले जात नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जुन्या नियमांप्रमाणे किंवा कालावधीनुसारच उपचार आणि परताव्याची स्थिती हाताळली जात आहे. परिणामी इसीएचएस लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेत इसीएचएस विभागाने ‘रेफरल’ कालावधीत वाढ केल्याची माहिती दिली असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फायदा काय?
- उपचारासाठीचा कालावधी उपयुक्त
- परतावा देखील मिळणार
- जुन्या नियमांमुळे उद्‍भवणाऱ्या समस्या दूर होतील
- लाभार्थ्यांना योग्य आणि चांगल्या सुविधा उपलब्ध होतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT