पुणे

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कुपवाडात मंगळवारी अनावरण

CD

पुणे, ता. ३ ः जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. ७ ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर मार्गावरील सर्व नद्यांच्या एकत्र केलेल्या पाण्याने जलाभिषेक करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबरच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि लष्करी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पूजन होणार आहे. पत्रकार परिषदेला संस्थेचे विश्वस्त अभयराज शिरोळे, ॲड. मिलिंद पवार, अखिल झांजले उपस्थित होते. जम्मू काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल मनोज सिन्हा, मैसूर येथील येडतोरे मठाचे पिठाधिपती श्री श्री शंकर भारती महास्वामीजी उद्‍घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा २० ऑक्टोबर रोजी मुंबई राजभवन येथून ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करीत कुपवाडा येथे रवाना करण्यात आला होता. साधारण २२०० किलोमीटरचा प्रवास करून हा पुतळा कुपवाडा येथे पोचला.

स्मारकस्थळी काही दिवसांत भव्य दालन उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास दृकश्राव्य माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. तसेच शस्त्रांचे प्रदर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची माहिती या दालनात असणार आहे.
- राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Crop Survey: ई-पीकच्या सर्व नोंदींची होणार पडताळणी; पारदर्शकतेसाठी नवी नियमावली; चुका टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल, असे आहेत नवीन बदल..

मोबाईल चार्जिंगने घात केला, स्फोट होताच संपूर्ण घराची झाली राखरांगोळी, नेमकी कुठं घडली घटना?

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर मृत्यूचा धोका वाढला; विरमाडे फाट्यावर अपघातांची मालिका, ग्रामस्थ संतप्त

Auto Rickshaw Permit: राज्यात नवीन ऑटोरिक्षा परमीट बंद; सोलापुरात जुन्या परमीटला लाखोंची किंमत, नवीन नियमावलीची चर्चा..

विजयचा करिश्मा! बहुमत जुळवताना दमछाक, पण विश्वासमत ठरावात १४४ मते; DMKचं वॉकआऊट, नाट्यमय घडामोडी

SCROLL FOR NEXT