पुणे

कन्यादान अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

CD

पुणे, ता. ३ : कन्यादान योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी आयोजक स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले.
कन्यादान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (नवबौद्धांसह), विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या पात्र जोडप्यांना २० हजार रुपये व सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रति पात्र जोडपे चार हजार रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.
सामूहिक विवाह सोहळे स्वयंसेवी संस्थांबरोबर केंद्र, राज्य शासकीय स्वायत्त संस्था, शासकीय तसेच सार्वजनिक प्राधिकरणे, जिल्हा परिषद आदींना आयोजित करता येतील. त्यांना स्वयंसेवी संस्थेप्रमाणे अटी लागू राहतील. स्वयंसेवी संस्थानी विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलिस ठाण्यासमोर, येरवडा- ०६ येथे संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.
0000

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Water Pipeline Burst: फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची १२०० मिमी जलवाहिनी फुटली; छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

SCROLL FOR NEXT