पुणे

कंत्राटी कामगारांची दिवळी होणार गोड

CD

पुणे, ता. ३ ः पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची यंदाची दिवाळी गोड होणार असून, त्यांना बोनस देण्याचा आदेश सहाय्यक कामगार आयुक्त नि. अ. वाळके यांनी काढला आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्र पाठविण्यात आले आहे. दरम्यान, हा बोनस महापालिका देणार नसली तरी महापालिकेच्या ठेकेदारांना बोनस प्रदान अधिनियम १९६५ लागू असल्याने त्यांच्याकडून ही रक्कम वितरित होणे आवश्‍यक आहे. या आदेशामुळे महापालिकेतील नऊ हजार कामगारांना न्याय मिळाला आहे.
महापालिकेत सुमारे नऊ हजार कंत्राटी कामगार असून, कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही बोनस, सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी बुधवारपासून (ता. १) महापालिकेपुढे उपोषण सुरु केलेले होते. कंत्राटी कर्मचारी आणि कायम कर्मचारी समान काम करत असल्याने कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही बोनस मिळावा, अशी मागणी लावून धरली होती.

काय झाले होते?
- पुणे महापालिकेने आम्ही किमान वेतन धोरणाप्रमाणे वेतन देत आहोत, त्यामुळे आम्ही बोनस देणार नाही. ही जबाबदारी ठेकेदाराची आहे अशी भूमिका घेतली
- गुरुवारी (ता. २) महापालिकेत बैठक घेतली होती, पण त्यात तोडगा निघाला नाही
- शुक्रवारी महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे काँग्रेसच्या शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अजित दरेकर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने बैठक घेतली
त्यामध्ये कायद्यानुसार ठेकेदाराने बोनस देणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. पण तसा आदेश महापालिकेकडे नसल्याचे सांगण्यात आले. अखेर यासंदर्भात कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून ठेकेदाराने बोनस देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट झाले. तसेच याबाबतचे पत्र सायंकाळी महापालिकेला पाठविण्यात आले आहे, असे अरविंद शिंदे यांनी सांगितले.

आज आम्ही आयुक्तांसोबत बैठक घेतली, त्याचप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्तांकडे पाठपुरावा केला. त्यांनी महापालिकेला पत्र पाठवून ठेकेदाराने बोनस देणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एक पगाराऐवढी रक्कम लगेच जमा करावी लागणार आहे, अन्यथा महापालिकेने ही रक्कम देऊन नंतर ठेकेदाराकडून ती वसूल करून घ्यावी. गेल्या १० वर्षांपासून बोनस बंद होता, त्यामुळे आजचा निर्णय हा ऐतिहासिक विजय आहे.
- सुनील शिंदे, अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर संघ,

सहाय्यक कामगार आयुक्तांचे महापालिकेला पत्र मिळाले आहे. महापालिकेच्या ठेकेदारांना बोनस प्रदान अधिनियमानुसार बोनस द्यावा लागेल असा आदेश दिला आहे. त्यानुसार ठेकेदारांकडून बोनस दिला जाईल. यावर महापालिकेचे लक्ष असेल.
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

गुलाल उधळून कामगारांचा जल्लोष
पुणे महापालिकेतील बैठक झाल्यानंतर कामगार कार्यालयाचे पत्र मिळविण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाची गडबड सुरु होती. शुक्रवारी हे पत्र आले नसते तर शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे हा निर्णय सोमवारपर्यंत लांबणीवर पडला असता. पाठपुरावा करून कामगार आयुक्त कार्यालयाकडून हे पत्र सायंकाळी प्राप्त झाले. ठेकेदाराने बोनस देणे बंधनकारक आहे याची घोषणा होताच महापालिकेपुढे कंत्राटी कामगारांनी घोषणाबाजी करत, गुलाल उधळून जल्लोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिम बंद केलं, आठवड्यात साहित्य विकायचं होतं, दगडूशेठ मदतीला धावला... 'कृष्णाईच्या लेकी' अभिनेत्याने सांगितला अनुभव

Gangapur Maize Crop Crisis : करपलेली मका मुरघाससाठी विकण्याची वेळ ; उत्पादन खर्चही निघणे कठीण; पश्चिम महाराष्ट्र-कर्नाटकातून चाऱ्यासाठी मागणी

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुंबई-पुण्यात गणेश विसर्जनाची लगबग; वाहतुकीपासून मिरवणुकीपर्यंत प्रत्येक अपडेट LIVE

Kolhapur Mumbai Special Train : दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून कोल्हापूर ते मुंबई, कलबुर्गीसाठी विशेष गाड्या जाहीर; पाहा रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक

Gyanesh Kumar Petition : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ; थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल, 'ते' 14 निर्णय वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT