पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी लवकरच नवीन कार्यप्रणाली

CD

पुणे, ता. १८ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शनिवारी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यासोबत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही मार्गाने विद्यापीठातील विविध प्रश्नांबाबत विविध संघटनांमार्फत होणारी आंदोलने, सभा, कार्यक्रम आदींसाठी सर्वसंमतीने कार्यप्रणाली विकसित करण्याचे ठरविण्यात आले. ही कार्यप्रणाली सर्वांच्या विचारार्थ ठेवावी, असे आवाहन विद्यार्थी संघटनांतर्फे करण्यात आले.

कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त रंजन शर्मा, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, माजी पोलिस अधिकारी जयंत उमराणीकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले आदी उपस्थित होते. डॉ. काळकर यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले.

कुलगुरू डॉ. गोसावी यांनी मागील परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची प्रतिमा कशी उंचावेल, यासाठी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हा शैक्षणिक संकुलाचा कणा आहे आणि त्यांच्यासोबतच्या समन्वयानेच विद्यापीठाची भविष्यात प्रगती होणार आहे.’’ शर्मा यांनी विद्यार्थ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून सर्व प्रक्रियांचे पालन केल्यास पोलिस प्रशासन कोणतीही कारवाई करणार नसल्याची हमी दिली.

विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांनी आपापसांत न भांडता, कोणी चुकीचे वागत असेल तर पोलिस व विद्यापीठातील सक्षम अधिकाऱ्यांकडे जावे. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करायला आम्हाला सुद्धा आवडत नाही, परंतु कायद्याचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये.
- रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

फोटो ः T83366, T83367

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : सासऱ्यांनी सुरू केलेल्या डिबेंचरविरोधात सुनेचा मोर्चा, ढोंगी माणसांना लोक ओळखून, हसन मुश्रीफांचा कोणावर रोख...

Minister Dattatreya Bharane: राज्यात रब्बी हंगाम क्षेत्रात होणार वाढ: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे; पाणी टंचाई जाणवणार नाही

Hingoli Diwali : फटाके उडवताना पाच वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला दुखापत; फुटलेला फटाका उडून डोळ्यातील बुब्बूळाला लागला अन्...

Khambatki Ghat Traffic : ऐन दिवाळीत खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; वाहनचालक हैराण, सातारा-पुणे महामार्गावर लांबलचक रांगा

VIDEO : गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग, अनेक प्रवासी जखमी; सकाळी ७ वाजता घडली दुर्घटना

SCROLL FOR NEXT