पुणे

७९० ग्रॅम वजनाच्या अर्भकाने दिली मृत्यूशी झुंज

CD

पुणे, ता. २० : अवघ्या २५ व्या आठवड्यात जन्मलेल्या ७९० ग्रॅम वजनाच्या अर्भकाचे प्राण वाचविण्यात पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे. फुफ्फुसाची कमी असलेली कार्यक्षमता, जन्मतः असलेला हृदयदोष आणि मेंदूतील रक्तस्राव अशा गुंतागुंतीवर यशस्वी मात हे या आव्हानात्मक उपचाराचे वैशिष्ट्य ठरले.
मुदतपूर्व प्रसूती आणि कमी वजनाचे अर्भक असे दुहेरी आव्हान नवजात अर्भक तज्ज्ञांपुढे होते. मात्र, प्रत्येक टप्प्यावर अचूक निदान आणि त्यावर परिणामकारक उपचार केल्याने रुग्णालयातून घरी सोडताना बाळाचे वजन १.८२ किलोपर्यंत वाढले होते. त्यानंतर पाच महिन्यांनी ३.३२ किलोपर्यंत वाढल्याची माहिती अंकुरा रुग्णालयातील नवजात अर्भक तज्ज्ञांनी दिली.
नवजात अर्भक विभागाचे प्रमुख डॉ. उमेश वैद्य म्हणाले, ‘‘जन्मानंतर बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तातडीने त्याला प्रतिजैविके देण्यात आली. अर्भकाच्या छातीचा काढलेल्या क्ष-किरणातून त्याला
‘रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’ (आरडीएस) आणि फुफ्फुसाच्या रक्तस्रावाबद्दल निदान झाले. त्याला ३६ आठवड्यांपर्यंत श्वसनक्रिया सुरळीत राहण्याकरिता प्रयत्न करावे लागणार होते; तसेच बाळाला ऑक्सिजनचीही आवश्यकता होती.’’
डॉ. अनुषा राव म्हणाल्या, ‘‘बाळाला जन्मानंतरच्या पहिल्या दिवसापासून ‘टोटल पॅरेंटरल न्यूट्रिशन’ची सुरुवात केली होती. हळूहळू स्तनपानास सुरुवात करण्यात आली. बाळाला नियमित स्तनपान, योग्य देखभाल, तेल मसाज, पुरेसा सूर्यप्रकाश, श्रवण आणि दृष्टी संबंधित विकासासाठी प्रयत्न करण्यात आला. वैद्यकीय उपचार तसेच मानसिक आधारामुळे अकाली जन्मलेल्या अर्भकांचे जीवन सुरक्षित होते.’’
डॉ. सिद्धार्थ मदभुशी म्हणाले, ‘‘अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे हे उपचार शक्य झाले. कमी वजनाच्या बाळांना काळजी घेण्याकरिता, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आवश्यक असतात.’’


पालक म्हणून, जेव्हा आम्ही आमच्या बाळाला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली. बाळाचं कमी वजन आणि अपूर्ण विकासाची आम्ही कल्पनादेखील केली नव्हती. अशा अवस्थेत त्याला श्वास घेण्यासाठी करावी लागणारी धडपड पाहून आम्ही हतबल झालो. तरीसुद्धा स्वतःला धीर देत आम्ही पुढील उपचारांना सामोरे गेलो. या साऱ्या प्रवासात डॉक्टरांच्या पथकाने साथ देत आमच्या बाळाला नवे आयुष्य दिले. बाळ आता सर्व शारीरीक हालचाली व स्तनपान करत आहे. हळूहळू त्याचा विकास होत आहे.
- राहुल आणि प्रियांका लुपाने,
बाळाचे आई-वडील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT