पुणे

शनिवारी रात्रभर रंगणार ‘ललित पौर्णिमा उत्सव’

CD

पुणे, ता. २१ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुलातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘ललित पौर्णिमा उत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. २५) रात्री ९.३० वाजता ललित कला केंद्राच्या अंगणमंचात सुरू होणारा हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत म्हणजे संपूर्ण रात्रभर सुरू असेल. या कार्यक्रमात प्राची वैद्य यांचे ‘आदिम गीत कथा’, ऋतुजा सोमण यांचे कथक नृत्य, डॉ. रुचिरा केदार यांचे ठुमरी व दादरा गायन, रुचिका खोत यांचा ‘द्रौपदी’, शुभम साठे यांचा ‘मेड इन इंडिया’, जान्हवी मराठे यांचा ‘जो आहा सो आहा’, संकेत खेडकर यांचा मूकाभिनय आदी विविधरंगी सादरीकरण पाहायला मिळतील.
----
‘भारतीय धर्मसंगीत’ पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन
पुणे, ता. २१ ः डॉ. केशवचैतन्य कुंटे लिखित ‘भारतीय धर्मसंगीत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी ६.३० वाजता टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात होणार आहे. पॉप्युलर प्रकाशन आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्यातर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून, डॉ. मिलिंद मालशे आणि डॉ. श्रीकांत बहुलकर याप्रसंगी उपस्थित असतील. यानिमित्ताने ‘विविध धर्मपरंपरांतील संगीत’ हा दृकश्राव्य कार्यक्रम डॉ. कुंटे सादर करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

Latest Marathi News Live Update : माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, वरून आदेश होते; पण त्यांच्यात कानफाडात मारण्याची हिंमत नव्हती, अजित घोरपडेंचा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष इशारा

Diwali Bonus: राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ७ हजार रुपयांपर्यंत बोनस; सरकारने जाहीर केल्या अटी

SCROLL FOR NEXT