पुणे

चुकवू नये असे काही

CD

१. मुलाखत व संगीत मैफिल
ज्येष्ठ गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त त्यांच्या मुलाखतीचे व संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी पं. पणशीकर यांच्या निवडक रचनांचे सादरीकरण त्यांच्या शिष्य परिवारातर्फे होणार आहे. त्यानंतर चिन्मयी सुमीत या पं. पणशीकर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया व ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर उपस्थित असतील.
कधी ः गुरुवार (ता. ६)
केव्हा ः सायंकाळी ७ वाजता
कुठे ः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

२. ‘चेहरे’ प्रदर्शन
नू. म. वि. प्रशालेतील चित्रकला विभागप्रमुख दत्तात्रय वेताळ यांनी रेखाटलेल्या पेन्सिल व्यक्तिचित्रांचे ‘चेहरे’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात आपल्याला चित्रपट क्षेत्रासह उद्योग, कला, क्रीडा, संगीत, शैक्षणिक व ऐतिहासिक अशा विविध क्षेत्रांतील प्रख्यात व्यक्तिमत्त्वे व त्यांचे चेहरे पेन्सिल रेखाटनात पाहायला मिळणार आहेत.
कधी ः शुक्रवार (ता. ७) ते रविवार (ता. ९)
केव्हा ः सकाळी १० ते रात्री ८
कुठे ः यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी, कोथरूड

३. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यावरील कार्यक्रम
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनदर्शन उलगडणाऱ्या ‘चरित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचे, त्यांच्याच काव्यातून’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मदा संस्थेतर्फे प्रस्तुत या कार्यक्रमाची संहिता मिलिंद सबनीस यांची असून संगीत अजय पराड यांचे आहे. अश्विनी पटवर्धन, कृपा नाईक, हिमानी नांदे, देवव्रत भातखंडे, ओंकार कपलाने, होनराज मावळे, बिल्वा द्रविड आदी कलाकार गायन करणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. ८)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता

४ ‘सुंदरा मनामध्ये भरली’
साधना कला मंचातर्फे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लावणीचा खानदानी प्रवास उलगडणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल जोशी, सुजित सोमण, मीनल पोंक्षे, श्रुती देवस्थळी हे गायक व गायिका यात सहभागी होणार असून प्राजक्ता मांडके-परहर आणि रवींद्र खरे याचे निवेदन करणार आहेत.
कधी ः रविवार (ता. ९)
केव्हा ः सायंकाळी ६ वाजता
कुठे ः हॅपी कॉलनी सभागृह, लेन क्रमांक १, कोथरूड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT