पुणे

पत्रकारांवरील हल्ले ही सुसंस्कृत महाराष्ट्रात शोकांतिका ः अजित पवार

CD

पुणे, ता. ८ ः राज्यात पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय काही पत्रकारांना जाणीवपूर्वक फौजदारी गुन्ह्यांमध्ये अडकविले जात आहे. पत्रकारांवरील हल्ले हे सुसंस्कृत महाराष्ट्रातील शोकांतिका असल्याचे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी (ता. ८) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. भविष्यात पत्रकारांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

ज्येष्ठ पत्रकार श्‍याम दौंडकर लिखित ‘धडपड’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी ॲड. अमरसिंह जाधवराव, ज्ञानेश्वर भोईटे, पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, प्रकाशक चंद्रकांत भुजबळ, लेखक श्‍याम दौंडकर आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘राज्यात सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाला वेगळे वलय आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यावर जाणीवपूर्वक हल्ले सुरू आहेत. कोकणात पत्रकाराची हत्या झाली. मागील आठवड्यात एका पत्रकाराला मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी दम दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘खोके’ या विषयावर रॅप साँग करणाऱ्याला कारागृहात टाकले. खोका हा उल्लेख केला तर, त्याला अटक करून संबंधितांनी खोक्याचे एकप्रकारे समर्थन केले आहे.’’ या पुस्तकात दौंडकर यांनी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांची गाथा मांडली, हे कौतुकास्पद असल्याचे पवार म्हणाले. दौंडकर यांनी आपल्या प्रास्ताविकेत पुस्तकाविषयी भूमिका आणि प्रेरणा सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT