पुणे

मेट्रो स्थानकांतील त्रुटींवर तज्ज्ञांनी ठेवले बोट

CD

पुणे, ता. १० ः वनाज-रामवाडी मार्गावरील मेट्रोच्या चारही स्थानकांच्या संरचनेच्या कामांतील त्रुटी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी तज्ज्ञांच्या एका गटाने महामेट्रोकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. केंद्रीय मेट्रो रेल्वेचे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनक गर्ग यांच्याकडेही या तज्ज्ञांनी महामेट्रोच्या कामाबाबत छायाचित्रांसह आक्षेप नोंदविले आहेत. दरम्यान, स्थानकांची संरचना सुरक्षित असल्याचा दावा महामेट्रोने केला आहे.
शहरातील वनाज-रामवाडी मार्गावरील मेट्रोचे गेल्या वर्षी ६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या मार्गावर गरवारे महाविद्यालय, नळस्टॉप, आनंदनगर, वनाज ही स्थानके आहेत. त्यावर सध्या प्रवासी वाहतूक सुरू आहे. हैदराबाद मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ, कोकण रेल्वेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले, स्थापत्य अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शिरीष खासबारदार आणि स्ट्रक्चरल अभियंते नारायण कोचक यांच्या गटाने गरवारे महाविद्यालय ते वनाज दरम्यानच्या मेट्रो मार्गाची आणि स्थानकांची पाहणी केली. त्याच्या आधारे त्यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, संचालक अतुल गाडगीळ आणि ‘सीएमआरएस’कडे निवेदन पाठविले आहे.
दरम्यान, ‘सीएमआरएस’ने ‘या त्रुटींबाबत आम्हाला कल्पना आहे, आम्ही योग्य ती दखल घेऊ’, असा ई-मेलद्वारे प्रतिसाद दिल्याचे गाडगीळ यांनी नमूद केले.

तज्ज्ञांची निरीक्षणे
- स्थानकांची उभारणी करताना त्याच्या आराखड्यात त्रुटी
- स्थानकांच्या लोखंडी कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज
- वेल्डिंगची कामे धोकादायक पद्धतीने पूर्ण करण्यात आली
- कामात वापरण्यात आलेल्या लोखंडाच्या दर्जाबाबतही शंका
- कामांची तपासणी राष्ट्रीय प्रमाणीकृत संस्थेकडून होणे गरजेची
- दरम्यानच्या काळात मेट्रोतून होणारी वाहतूक थांबविणे गरजेचे
- या त्रुटींमुळे स्थानकात अपघाताची शक्यता

मेट्रो कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेबाबत दुर्लक्ष करून चालणार नाही. इतका मोठा प्रकल्प राबविताना प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असून तिच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही फक्त चार स्थानकांची पाहणी केली आहे. अन्य स्थानके खुली झालेली नसल्यामुळे तेथे काय सुरू आहे, याबाबत कल्पना नाही. मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चारही स्थानकांचे तज्ज्ञांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.
- विवेक गाडगीळ, माजी व्यवस्थापकीय संचालक, हैदराबाद मेट्रो

महामेट्रो म्हणते ‘एकदम ओके’
काही तज्ज्ञांनी निदर्शनास आणलेल्या कमतरतांची पुणे मेट्रोला जाणीव आहे. त्या त्रुटी महामेट्रो दूर करत आहे. त्या त्रुटी कामगारांच्या होत्या. याबाबत महामेट्रोने काही कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईही केली आहे. मात्र स्थानकांची एकूण रचना सुरक्षित आहे. थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी महामेट्रोने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची (सीओईपी) नियुक्ती केली. त्यांच्या अहवालात असा निष्कर्ष काढला आहे की संरचना अभियांत्रिकीदृष्ट्या सुरक्षित आहे आणि त्रुटी योग्य प्रक्रियेसह मेट्रोने दूर केल्या आहेत. स्थानकांची रचना पूर्णपणे सुरक्षित आहे, असे महामेट्रोचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT