पुणे

विविध मुद्यांवर आरक्षण हक्क कृती समितीचे आज आंदोलन

CD

पुणे, ता. १० : विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, जातीनिहाय जनगणना, शिक्षणातील खाजगीकरण, खासगी क्षेत्रात आरक्षण आणि कामगारांविरुद्ध कायदे, अशा विविध प्रश्नांसंदर्भात आरक्षण हक्क कृती समितीच्यावतीने मंगळवारी (ता. ११) राज्यभरात जन आंदोलन करण्यात येणार आहे.

महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मदिनी मंगळवारी (ता. ११) रोजी त्यांना अभिवादन करून मुंबर्इतील आझाद मैदानात आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक माजी खासदार हरिसिंग राठोड यांनी सोमवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत दिली.
महाविकास आघाडी सरकार असो किंवा आताचे शिंदे-फडणवीस सरकार हे मागासवर्गीय तथा कामगार, अधिकारी, कर्मचारी, शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बढतीमधील आरक्षणाबाबत राज्य सरकार यांच्याकडे आम्ही वारंवार मागणी करीत असून अनेक निदर्शने देखील केली. मात्र, आंदोलने करून देखील या सरकारने कुठलीही दखल घेतलेली नाही. उलट हे सरकार मागासवर्गीयांच्या कुठल्याच विषयाबाबत गंभीर नसून केवळ वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे. त्यामुळे आंदोलन करणार आहे, असे राठोड यांनी सांगितेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT