पुणे

मराठी गझलेवरील कार्यशाळेचे आयोजन

CD

मराठी गझला कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे, ता. १० : रंगत संगत प्रतिष्ठान, करम प्रतिष्ठान, साहित्यदीप प्रतिष्ठान आणि ब्रह्मकमळ साहित्य समूहातर्फे ‘मराठी गझल : आकृती आणि आशय’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित चर्चासत्रात भूषण कटककर यांनी नवोदित गझलकारांशी संवाद साधला. ‘गझलेचे तंत्र’ या विषयावर वैभव कुलकर्णी आणि दास पाटील यांनी मार्गदर्शन केले. अखेरच्या सत्रात आयोजित मुशायरामध्ये अनिरुद्ध वासमकर, नागेश नायडू, एकनाथ धनके, संदीप मर्ढेकर, गोकूळ सोनवणे, प्रमोद खराडे, विजय उतेकर, पूजा फाटे, सतीश मालवे, प्रशांत पोरे यांचा सहभाग होता.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा कुलकर्णी आणि वैशाली माळी यांनी केले. ज्योत्स्ना चांदगुडे यांनी प्रास्ताविक केले. तर विशाल राजगुरू यांनी आभार मानले.
----
कलाप्रेमी मंचातर्फे ‘सप्तसूर रंगले’
पुणे, ता. १० : कलाप्रेमी मंचाच्या वर्धापनदिनानिमित्त ‘सप्तसूर रंगले’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात चारूशीला बेलसरे यांनी भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते सादर केली. ‘मन हे रामरंगी रंगले’ या रचनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर ‘माझे माहेर पंढरी’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘काहे तरसाए’ आदी गीते सादर झाली. संजय मराठे यांनी नाट्यगीते सादर केली. मुकुंद जोग यांनी व्हायोलिनवर काही गीते प्रस्तुत केली. संजय पारखी यांनी तबल्यावर साथ केली. यावेळी ज्येष्ठ विचारवंत काशिनाथ शिगवण, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT