पुणे

न्यायालयाने फेटाळले दोघांचे जामीन अर्ज

CD

पुणे, ता. १० : बनावट कागदपत्रांच्या आधारे कोंढवा येथील तीन गुंठे जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी हा आदेश दिला.
शेख अल्ताफ हुसेन अब्दुल मलिक आणि शेख जिया अहमद अब्दुल मलिक (दोघेही रा. कोंढवा) असे जामीन फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत एम. डी. यासीन शेख यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंद मदनलाल मदानी, जहाँगीर दोराबजी यांच्या जामीन फेटाळण्यात आलेल्या दोघांच्या विरोधात फसवणूकसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. एप्रिल २०२२ मध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणात मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. पुष्कर पाटील, अ‍ॅड. अनुज मंत्री आणि अ‍ॅड. महेश घुगे यांनी काम पाहिले. आरोपींनी संगनमताने कोंढवा येथील सर्वे नंबर ११/८ या मिळकतीचा शासनाच्या कुठल्याही कार्यालयात नमूद नसणाऱ्या पोट उतारा खरा भासवून व त्यांचे बनावट कागदपत्र तयार करून जागेचा परस्पर व्यवहार केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

SCROLL FOR NEXT