पुणे

दस्तनोंदणीचे रजिस्टेशन संगणक प्रणालीद्वारे होणार

CD

दस्तनोंदणीचे रजिस्ट्रेशन संगणक प्रणालीद्वारे होणार

पुणे, ता. १० : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने बांधकाम प्रकल्पात २० पेक्षा अधिक सदनिका अथवा दुकाने असतील तर त्या प्रकल्पांमध्ये दस्तनोंदणीसाठी ई रजिस्ट्रेशन ही संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.


या उपक्रमाची भुरळ दिल्ली सरकारने पाडली असून त्यांनी सोमवारी तेथील अधिकाऱ्यांनी नोंदणी विभागाला भेट देऊन या प्रकल्पाची माहिती घेतली. दस्तनोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. नागरिकांना ऑनलाइन सुविधा देण्यात नोंदणी विभाग अग्रेसर आहे. मागील काही वर्षांपासून नोंदणी विभागाने कात टाकली असून संगणक प्रणालीचा वापर करून अधिकाधिक सुविधा नागरिकांना घरबसल्या कशा मिळतील, यावर भर दिला जात आहे. ही सुविधा फक्त नवीन सदनिकांसाठीच (फर्स्ट सेल)असणार आहे. यामुळे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत नाही. त्याचबरोबर दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी कमी होण्यास यामुळे मदत होत आहे.
यासंदर्भात नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर म्हणाले,‘‘नोंदणी व मुद्रांक कार्यालयात दिल्ली राज्य शासनाच्या चार अधिकाऱ्यांनी भेट देऊन ई रजिस्ट्रेशनबरोबरच अन्य ऑनलाइन सुविधेची माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष ई रजिस्ट्रेशन कसे होते, याची प्रत्यक्ष माहिती घेतली.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुण्यात महिलांच्या नावावरील घरांना ५० टक्के करमाफी; भाजपने निवडणुकीत दिलेला शब्द फिरवला

Sleep Crisis in India: भारतीयांची झोप ‘आउट ऑफ ट्रॅक’; बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे धक्कादायक वास्तव समोर

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण: आज 3.30 वाजता महत्त्वाची सुनावणी

Ratnagiri Mango Crisis : आंबा शौकिनांना मोठा झटका! यंदा हापूसच्या उत्पादनात 80-90 टक्क्यांची प्रचंड घट; कृषी विभागाच्या अहवालात धक्कादायक आकडेवारी

मालमत्ताधारकांना दिलासा! प्राॅपर्टी कार्डमधील फेरफार ऑनलाइन; ४५ प्रकारच्या अर्जांसाठी विशेष पोर्टल

SCROLL FOR NEXT