पुणे

शैक्षणिक वर्ष एक ऑगस्टपासून होणार सुरू कुलसचिव डॉ. पवार यांची माहिती ः विद्यापीठातव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठरली नियोजनाची दिशा

CD

पुणे, ता. १० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पुढील शैक्षणिक वर्ष एक ऑगस्टपासून सुरू करणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत शैक्षणिक वेळापत्रक निश्चित करून नियोजन करण्यात येईल,’’ अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

विद्यापीठाच्या नव्याने स्थापन झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांची ही पहिलीच सभा झाली. सर्व सदस्यांबरोबर विद्यापीठातील संविधानिक अधिकारी, प्रशासकीय विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांच्यासमवेत परिचय आणि संवाद झाला. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. नुकत्याच झालेल्या अधिसभेत यापूर्वी स्थापन केलेल्या डॉ. राजेंद्र विखे- पाटील समितीसमवेत सहयोगाने विद्यापीठाच्या परिक्षा विषयक कामकाज वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याबाबत समितीला सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक वर्षात आलेली अनियमितता पुन्हा सुरळीत करण्यासाठी विद्यापीठाचे हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

याशिवाय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठाच्या नगर आणि नाशिक येथील उपकेंद्र विकास व समन्वय समितीचे स्थापन करणार आहे. यात डॉ. विखे-पाटील, सागर वैद्य यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये विद्यापीठाचे संबंधित जिल्ह्यातील व्यवस्थापन परिषद आणि अधिसभा सदस्यांचा समावेश असणार आहे. तसेच महाविद्यालयीन स्तरावर विविध कारणांनी भेटी देणाऱ्या विद्यापीठाच्या तज्ञ समितीमध्ये पात्र असणाऱ्या सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे धोरण राबविण्यासाठी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती केली आहे.

तसेच विद्यापीठाच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ‘जी २०’ परिषदेच्या अनुषंगाने विद्यापीठात कार्यक्रम आयोजन करण्यासाठी रवींद्र शिंगणापूरकर अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT