पुणे

रिक्षा नव्हे, हे तर ‘फिरते वाचनालय’ वाचनाची गोडी निर्माण करण्याकरिता प्रशांत कांबळे यांचा अनोखा उपक्रम

CD

पुणे, ता. ११ : वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा, लोक पुस्तके वाचायला उद्युक्त व्हावीत, म्हणून त्यांना वाचनालयांपर्यंत आणून पुस्तकांची गोडी लावण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र हे वाचनालयच वाचकांपर्यंत नेले तर? हाच अभिनव विचार करत पुण्यातील एका रिक्षाचालकाने चक्क आपल्या रिक्षातच वाचनालय सुरू केले आहे. या चालकाचे नाव आहे प्रशांत कांबळे.

कांबळे हे पिंपळे निलख येथील रहिवासी आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते रिक्षा चालवतात. कोरोनाकाळात रिक्षाद्वारे घरपोच भाजी पोचवण्याचा व्यवसाय ते करत होते. त्यावेळी फावल्या वेळात रिक्षात बसून ते पुस्तक वाचत असत. त्याचवेळी ही पुस्तके रिक्षातून प्रवास करताना प्रवाशांनाही वाचायला नक्कीच आवडतील, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यासाठी रिक्षातच त्यांनी एक छोटेसे लाकडी कपाट तयार केले. एकावेळी या कपाटात चाळीस ते पन्नास पुस्तके ते ठेवतात. रिक्षात बसलेल्या प्रवाशांनी हवे ते पुस्तक निवडावे आणि वाचावे, अशी ही कल्पना आहे. रिक्षातील प्रवास सुखदायी आणि ज्ञानवर्धक करणाऱ्या या उपक्रमाला प्रवाशांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

प्रशांत कांबळे हे मूळचे नाट्यकलाकार आहेत. विविध प्रायोगिक नाटकांत त्यांनी काम केले आहे. मात्र कोरोनाकाळात नाट्य व्यवसायाला खीळ बसली. परिणामी, नाईलाजाने रिक्षा व्यवसायाकडे त्यांना वळावे लागले. ‘‘स्वतःच्या मालकीची रिक्षा पूर्वी दुसऱ्याला चालवण्यास दिली होती. मात्र आता स्वतःच रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो आहे. नाटकाची आवड असल्याने या व्यवसायासह नाटकात काम करणेही सुरू ठेवेन,’’ असे कांबळे यांनी सांगितले.

वैविध्यपूर्ण पुस्तकांचा कप्पा
प्रशांत कांबळे यांच्या या रिक्षात कथा, कविता, कादंबरी, वैचारिक अशा वैविध्यपूर्ण प्रकारांतील पुस्तकांचा संच पाहायला मिळतो. यामध्ये स्वामी विवेकानंद यांचे ‘ज्ञानयोग’, सुनील गावसकर यांचे ‘आयडॉल्स’, आचार्य अत्रे यांचे ‘अत्रेटोला’, शिवराज गोर्ले यांचे ‘नग आणि नमुने’, बाबा आमटे यांचे ‘ज्वाला आणि फुले’, व. पु. काळे लिखित ‘रंग मनाचे’, कुसुमाग्रज यांचे ‘विशाखा’, अशोक नायगावकर यांचे ‘वाटेवरच्या कविता’ आदी पुस्तके यात पाहायला मिळतात.

रिक्षामध्ये मी फक्त मराठी पुस्तकेच ठेवतो. कारण अलीकडे तरुणाईच्या बोलण्यातून मराठी भाषा अस्तंगत होत चालली आहे, असे दिसून येते. त्यामुळे वाचानाची गोडी लावण्यासह तरुणांना मराठीबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, असा माझा उद्देश आहे.
प्रशांत कांबळे, रिक्षाचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 48 तासांत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यावर सुनावणी, कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागितले

Gurucharan Singh: बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग अखेर घरी परतला; म्हणाला, "मी धार्मिक प्रवासाला निघालो होतो..."

Stock Market: 20 मे रोजी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार का?

IPL 2024 MI vs LSG : मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम;निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे लखनौच्या २१४ धावा

Latest Marathi News Live Update : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसची धडक 25 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT