पुणे

वणवे रोखण्यासाठी आता ‘फायर फायटर वॉर रूम’

CD

पुणे, ता. १३ : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे जिल्ह्याच्या विविध वन परिक्षेत्रांत वणव्यांचा धोका वाढू लागला आहे. पुणे जिल्ह्यातील स्थिती पाहता मागील तीन महिन्यांत घडलेल्या वणव्यांच्या घटनांमुळे एकूण १४० एकर वन जागा जळून खाक झाली. पुणे वन विभागाद्वारे देण्यात आलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. भविष्यात वणवे लागून वन क्षेत्रातील झाडांची संख्या कमी होऊ नये, म्हणून विभागाद्वारे लवकरच ‘फायर फायटर वॉर रूम’ची स्थापना करण्यात येणार आहे.

गेल्या तीन महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते मार्च या काळात जिल्ह्यातील विविध भागांत वणव्यांच्या २५ घटना घडल्या. त्यामध्ये सर्वाधिक वणवे फेब्रुवारी महिन्यात लागले होते. यंदाचा फेब्रुवारी महिना गेल्यावर्षीच्‍या तुलनेत उष्ण ठरला आहे. तसेच जानेवारी ते मार्च या कालावधीत लागलेल्या वणव्यांमुळे एकूण १४० एकर वन क्षेत्रातील झाडे जळाली आहेत. या घटना पुणे शहर, दौंड, भांबुर्डा, इंदापूर, वडगाव मावळ, शिरोता, पौड, बारामती या भागात झाल्याची नोंद वन विभागाने केली आहे. तर गेल्या वर्षात २४२ एकर वन क्षेत्र वणव्यात खाक झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती व वन्यजीवांची जीवितहानी झाल्याचे विभागाने सांगितले आहे. उन्हाळ्यात बऱ्याचदा उन्हाच्या तीव्र झळा किंवा मानवी कारणांमुळे येथील वाळलेल्‍या गवतांना आग लागते. बऱ्याचदा अशा आगीला नियंत्रित करणे आव्हानात्मक ठरते. एकीकडे शहरात विकासकामांमुळे आधीच झाडांची संख्या घटत असून, दुसरीकडे दरवर्षी वणवे लागण्याच्या घटनाही घडतात.

‘फायर फायटर वॉर रूम’मध्ये वणवा रोखण्यासाठी लागलेला वेळ, घटना कोठे घडली, त्यासाठी किती वनरक्षक व स्वयंसेवक उपस्थित होते, वणव्याची कारणे, त्यामुळे झालेले नुकसान अशा सर्व गोष्टींचा सातत्याने आढावा घेतला जाणार आहे.
- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग

३६६५८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT