पुणे

महाराष्ट्र श्री अन्न अभियान राबविण्यास मान्यता

CD

पुणे, ता २२ : राज्यात १ एप्रिलपासून ३१ मार्च २०२४ या कालावधीत पौष्टिक तृणधान्याची उत्पादन वाढ, तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी विकास आदीसाठी ‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.

संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले असून याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात महाराष्ट्र ‘श्री अन्न (मिलेट्स) अभियान’ सुरू करणे आणि त्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा केली होती. या अभियानातंर्गत पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचणे व या तृणधान्यांचा आहारातील वापर वाढवण्यासाठी राज्यस्तरीय कृषि परिषदा, जिल्हास्तरीय कृषि महोत्सव, मिलेट दौड, पाक कला, कृती स्पर्धा, आहारतज्ज्ञाची व्याख्याने आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.

अन्न प्रक्रिया योजनेसाठी ५० कोटी
पौष्टिक तृणधान्यांचे राज्यातील लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत प्रचार प्रसिद्धी, पिक प्रात्याक्षिके, सुधारित व संकरीत प्रमाणित बियाणांचे वितरण आदी उपक्रम राबविण्याकरीता ११० कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर आत्मा योजनेअंतर्गत तृणधान्यांचे बियाणे मिनीकिट उपलब्ध करणे व क्षेत्र विस्तार करणे आदी माध्यमातून प्रचार प्रसिद्धी, विविध स्तरावर स्पर्धा आयोजन करण्यास रुपये ५ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ५ कोटी रुपये, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत व मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी ५० कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे, असेही चव्हाण म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT